नगरमध्ये टोमॅटो, वांगी, कारल्याला अधिक मागणी

नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवड्यात भाजीपाल्याच्या आवकेत काहीशी घट झाली. मात्र टोमॅटो, वांगी, कारल्याला अधिक मागणी होती. शनिवारी (ता.६) कांद्याचे लिलाव सुरू झाले. त्यात ३३०० रुपयापर्यंत गावरान कांद्याचा दर स्थिर राहिला.
Tomatoes, eggplants, More demand in Nagar
Tomatoes, eggplants, More demand in Nagar

नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवड्यात भाजीपाल्याच्या आवकेत काहीशी घट झाली. मात्र टोमॅटो, वांगी, कारल्याला अधिक मागणी होती. शनिवारी (ता.६) कांद्याचे लिलाव सुरू झाले. त्यात ३३०० रुपयापर्यंत गावरान कांद्याचा दर स्थिर राहिला. 

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत दर दिवसाला साधारण एक हजार ते १ हजार १०० क्विंटल भाजीपाल्याची आवक होत असते. मात्र दिवाळीमुळे भाजीपाल्याच्या आवकेत काहीशी घट झाली. साधारणतः दर दिवसाला ६०० क्विंटलपर्यंत आवक झाली. टोमॅटोची १६० ते १७० क्विंटल दर दिवसाला आवक होऊन १००० ते ३५०० रुपयाचा प्रतिक्विंटल दर मिळाला. वांग्यांची ३० ते ३५ क्विंटल आवक होऊन दीड हजार ते सहा हजार, फ्लॉवरची ४७ ते ५० क्विंटल आवक होऊन १००० ते ३५००, काकडीची ४५ ते ५० क्विंटल आवक होऊन १००० ते २५०० रुपये दर मिळाला.

दोडक्याची १२ ते १५ क्विंटल आवक होऊन १५०० ते ४५०० रुपये, भेंडीची ३१ ते ३५ क्विंटल आवक होऊन एक हजार ते चार हजार, बटाट्याची १०० ते १२० क्विंटल आवक होऊन १ हजार ते १९०० रुपये, कारल्याची २६ क्विंटलची आवक होऊन १००० ते अडीच हजार, हिरव्या मिरचीचे ६८ ते ७० क्विंटल आवक होऊन ३००० ते ४०००, सिमला मिरचीचे आठ ते दहा क्विंटल आवक होऊन ३५०० ते सहा हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

मेथीच्या १८०० जुड्यांची दर दिवसाला आवक होऊन येते १२०० रुपये प्रति १०० जुड्याला दर मिळाला. कोथिंबिरीच्या २७०० जुड्यांची आवक होऊन ८०० ते दीड हजार रुपये, पालकाच्या १०० ते १५० जुड्यांची आवक होऊन ८०० ते दीड हजार रुपयाचा दर १०० जुड्याला मिळाला.  लाल कांदा २८०० रुपयांपर्यंत स्थिर 

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या गावरान कांद्याची साधारण २५ हजार क्विंटल तर लाल कांद्याची साधारण पाच हजार क्विंटलची आवक होत आहे. दिवाळीमुळे चार दिवस लिलाव बंद होते. शनिवारी कांद्याचे लिलाव झाले गावरान कांद्याला ३३०० रुपये पर्यंतचा दर स्थिर होता तर लाल कांद्याचा दर २८०० रुपयापर्यंत स्थिर होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com