सोलापुरात टोमॅटो, बटाटा तेजीत

सोलापुरात टोमॅटो, बटाटा तेजीत
सोलापुरात टोमॅटो, बटाटा तेजीत

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात टोमॅटो, बटाटा आणि हिरव्या मिरचीची आवक चांगली राहिली. शिवाय मागणी असल्याने त्यांचे दरही तेजीत राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात टोमॅटोची ५०० क्विंटल, बटाट्याची ७०० क्विंटल आणि हिरव्या मिरचीची ७६ क्विंटल आवक झाली. मागणीत आणि आवकेत सातत्याने वाढ होते आहे. टोमॅटोला प्रतिक्विंटलला किमान ३०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ३२०० रुपये, बटाट्याला किमान ३०० रुपये, सरासरी १००० रुपये, २५०० रुपये आणि हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये,  सरासरी १२०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये असा दर मिळाला. 

त्याशिवाय घेवडा, गवार, भेंडीलाही चांगला उठाव मिळाला. त्यांचे दरही स्थिर राहिले.  त्यांची आवकही जेमतेमच प्रतिदिन २० ते ३० क्विंटलपर्यंत राहिली. घेवड्याला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये, गवारला प्रतिक्विंटलला किमान २००० रुपये, सरासरी ४००० रुपये आणि ६००० रुपये तर भेंडीला किमान ४०० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये असा दर मिळाला. 

भाजीपाल्यामध्ये कोथिंबिर, मेथी, शेपूचे दर स्थिर राहिले. भाज्यांची आवकही प्रत्येकी ५ ते १० हजार पेंढ्यांपर्यंत राहिली. कोथिंबिरीला शंभर पेंढ्यासाठी ५०० ते ८०० रुपये, मेथीला ६०० ते ८०० रुपये, शेपूला ३०० ते ४०० रुपये असा दर मिळाला. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये असा दर मिळाला. तर लसणाला प्रतिक्विंटलला ७ हजार, सरासरी १० हजार रुपये व १६ हजार रुपये उच्चांकी दर मिळाला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com