नगरमध्ये टोमॅटो ५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल

Tomatoes in the Nagar Rs 500 to Rs 2000 per quintal
Tomatoes in the Nagar Rs 500 to Rs 2000 per quintal

नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. १९) टोमॅटोची ५२ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ५०० ते २००० व सरासरी १३५० रुपयांचा दर मिळाला, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. 

नगर बाजार समितीत दर दिवसाला साधारण १८०० ते २ हजार क्विटंल भाजीपाल्याची आवक होत असते. वांग्यांची ३८ क्विटंलची आवक होऊन ५०० ते ४००० व सरासरी २२५० रुपयांचा दर मिळाला. कोबीची ४८ क्विंटलची आवक झाली. तिला ५०० ते २००० व सरासरी १२५० रुपयांचा सरासरी दर मिळाला. काकडीची ५५ क्विंटलची आवक होऊन ५०० ते २००० व सरासरी १२५० रुपयांचा दर मिळाला. गवारीची १५ क्विटंलची आवक होऊन ३००० ते ६००० व सरासरी ४५०० रुपयांचा दर मिळाला. घोसाळ्याची १८ क्विंटल आवक झाली. त्यास १००० ते २८०० व सरासरी १९५० रुपयांचा दर मिळाला. 

दोडक्याची १५ क्विंटल आवक झाली. त्यास २००० ते ५००० व सरासरी ३५०० रुपयांचा दर मिळाला. कारल्याची २८ क्विंटल आवक झाली. त्यास १००० ते ३००० व सरासरी २००० रुपयांचा दर मिळाला. भेंडीची ४२ क्विंटलची आवक होऊन १००० ते ३००० व सरासरी २००० रुपयांचा दर मिळाला. वालची १५ क्विंटलची आवक झाली. त्यास २००० ते ४००० व सरासरी ३००० रुपयांचा सरासरी दर मिळाला. घेवड्याची २८ क्विंटलची आवक झाली व १००० ते २५०० व सरासरी १७५० रुपयांचा सरासरी दर मिळाला. बटाट्याची ११५० क्विंटलची आवक होऊन १००० ते २००० व सरासरी दीड हजार रुपयाचा दर मिळाला. शेवग्याची १८ क्विंटलची आवक होऊन ४५०० ते ६००० व सरासरी ५२५० रुपयांचा दर मिळाला.

हिरव्या मिरचीची २५ क्विंटलची आवक

हिरव्या मिरचीची २५ क्विंटलची आवक होऊन १००० ते ३००० व सरासरी २००० रुपयाचा सरासरी दर मिळाला. गाजराची ८ क्विंटलची आवक होऊन १५०० ते ३००० व सरासरी २२५० रुपयांचा दर मिळाला. शिमला मिरचीची ३२ किवंटलची आवक होऊन २००० ते ३००० व सरासरी २५०० रुपयांचा दर मिळाला. मेथीच्या ७३२० जुड्यांची आवक होऊन शंभर जुड्याला ५०० ते १५०० व सरासरी १००० तर पालकच्या १२५० जुड्याची आवक होऊन ८०० ते १४०० व सरासरी ११०० रुपयांचा दर मिळाला. ४०० ते १४०० व सरासरी ९०० रुपयांचा दर मिळाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com