Agriculture news in marathi Tomatoes Rates 500 to 2000 rupess per quintal | Agrowon

नगरमध्ये टोमॅटो ५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. १९) टोमॅटोची ५२ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ५०० ते २००० व सरासरी १३५० रुपयांचा दर मिळाला, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. 

नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. १९) टोमॅटोची ५२ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ५०० ते २००० व सरासरी १३५० रुपयांचा दर मिळाला, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. 

नगर बाजार समितीत दर दिवसाला साधारण १८०० ते २ हजार क्विटंल भाजीपाल्याची आवक होत असते. वांग्यांची ३८ क्विटंलची आवक होऊन ५०० ते ४००० व सरासरी २२५० रुपयांचा दर मिळाला. कोबीची ४८ क्विंटलची आवक झाली. तिला ५०० ते २००० व सरासरी १२५० रुपयांचा सरासरी दर मिळाला. काकडीची ५५ क्विंटलची आवक होऊन ५०० ते २००० व सरासरी १२५० रुपयांचा दर मिळाला. गवारीची १५ क्विटंलची आवक होऊन ३००० ते ६००० व सरासरी ४५०० रुपयांचा दर मिळाला. घोसाळ्याची १८ क्विंटल आवक झाली. त्यास १००० ते २८०० व सरासरी १९५० रुपयांचा दर मिळाला. 

दोडक्याची १५ क्विंटल आवक झाली. त्यास २००० ते ५००० व सरासरी ३५०० रुपयांचा दर मिळाला. कारल्याची २८ क्विंटल आवक झाली. त्यास १००० ते ३००० व सरासरी २००० रुपयांचा दर मिळाला. भेंडीची ४२ क्विंटलची आवक होऊन १००० ते ३००० व सरासरी २००० रुपयांचा दर मिळाला. वालची १५ क्विंटलची आवक झाली. त्यास २००० ते ४००० व सरासरी ३००० रुपयांचा सरासरी दर मिळाला.

घेवड्याची २८ क्विंटलची आवक झाली व १००० ते २५०० व सरासरी १७५० रुपयांचा सरासरी दर मिळाला. बटाट्याची ११५० क्विंटलची आवक होऊन १००० ते २००० व सरासरी दीड हजार रुपयाचा दर मिळाला. शेवग्याची १८ क्विंटलची आवक होऊन ४५०० ते ६००० व सरासरी ५२५० रुपयांचा दर मिळाला.

हिरव्या मिरचीची २५ क्विंटलची आवक

हिरव्या मिरचीची २५ क्विंटलची आवक होऊन १००० ते ३००० व सरासरी २००० रुपयाचा सरासरी दर मिळाला. गाजराची ८ क्विंटलची आवक होऊन १५०० ते ३००० व सरासरी २२५० रुपयांचा दर मिळाला. शिमला मिरचीची ३२ किवंटलची आवक होऊन २००० ते ३००० व सरासरी २५०० रुपयांचा दर मिळाला.

मेथीच्या ७३२० जुड्यांची आवक होऊन शंभर जुड्याला ५०० ते १५०० व सरासरी १००० तर पालकच्या १२५० जुड्याची आवक होऊन ८०० ते १४०० व सरासरी ११०० रुपयांचा दर मिळाला. ४०० ते १४०० व सरासरी ९०० रुपयांचा दर मिळाला. 

बाजारदरांच्या ताज्या माहितीसाठी क्लिक करा...
 


इतर बाजारभाव बातम्या
नाशिकमध्ये लसणाची आवक साधारण; दरही...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
नगरमध्ये आले चार ते पाच हजार रूपये...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
सोलापुरात ढोबळी मिरची, वांगी, काकडीला...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे बाजार समितीत व्यवहार सुरळीत...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत वांगे प्रतिक्विंटल २००० ते ४०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
ऐन श्रावणातही नाशिकचा फुलबाजार...नाशिक : धार्मिक दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा...
राज्यात टोमॅटो १०० ते ६०० रूपये क्रेटअकोल्यात ३५० ते ६०० रुपये क्रेट अकोला...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल १००० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जुन्नर, नारायणगावात टोमॅटोचे दर टिकूनपुणे ः जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
जळगावात गवार २००० ते ४२०० रुपये...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची मागणी, दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये घेवडा, वांग्यांच्या दरात...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील...
सोलापुरात भाज्यांना उठाव, वांगी,...सोलापूर ः कोरोनामुळे दहा दिवसांचा लॅाकडाऊन आहे....
पुण्यात भाजीपाल्याचा पुरवठा संतुलित; दर...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव  ः खानदेशात केळी दरांवर दबाव कायम आहे...
परभणीत भेंडी ८०० ते १२०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात कांद्याला १०० ते १००० रूपये दर सोलापुरात कांद्याला सर्वाधिक १००० रुपये दर...
सणासुदीदरम्यान फुलांना मागणी वाढण्याचा...पुणे  : मार्चपासून राज्यात ‘कोरोना’चे संकट...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल २००० ते...नाशिक : ‘‘येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...