Agriculture news in marathi, Tomatoes in Solapur Rs. 200 to 2500 per quintal | Agrowon

सोलापुरात टोमॅटो २०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बुधवारी (ता. २) टोमॅटो, वांगी, गवार आणि भेंडीला सर्वाधिक उठाव राहिला. त्यांची आवकही तशी जेमतेम राहिली. पण मागणी असल्याने दर टिकून राहिले. टोमॅटोला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी ६०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.  

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बुधवारी (ता. २) टोमॅटो, वांगी, गवार आणि भेंडीला सर्वाधिक उठाव राहिला. त्यांची आवकही तशी जेमतेम राहिली. पण मागणी असल्याने दर टिकून राहिले. टोमॅटोला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी ६०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.  

बाजार समितीच्या आवारात बुधवारी टोमॅटोची ७०० क्विंटल, वांग्याची १०० क्विंटल, गवारीची ५ क्विंटल आणि भेंडीची २० क्विंटलपर्यंत आवक झाली. या सर्व पळभाज्यांची आवक स्थानिक भागातूनच झाली. गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून त्यांच्या दरात तेजी आहे. विशेषतः टोमॅटो आणि वांग्याच्या दरात चांगलीच सुधारणा झाली आहे. गवार, भेंडीच्या मागणीतही सातत्य आहे. मागणी असल्याने दर टिकून आहेत. 

वांग्याला किमान ४०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक २८०० रुपये, गवारीला किमान १५०० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ४५०० रुपये, तर भेंडीला किमान १००० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय ढोबळी मिरची, हिरव्या मिरचीलाही चांगला उठाव मिळाला. त्यांचे दरही स्थिर होते. 

ढोबळी मिरचीला प्रतिक्विंटलला किमान ४०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये, तर हिरव्या मिरचीला किमान ८०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये असा दर मिळाला. भाजीपाल्यालाही मागणी होती, पण आवक जेमतेमच राहिली. प्रत्येकी ८ ते १० पेंढ्या अशी आवक राहिली. भाज्यांची आवकही स्थानिक भागातूनच झाली. त्यातही मेथी, शेपू, कोथिंबिरीला उठाव मिळाला. कोथिंबिरीला १०० पेंढ्यांसाठी ३०० ते ५०० रुपये, मेथीला ४०० ते ७०० रुपये आणि शेपूला २०० ते ५०० रुपये दर मिळाला.

कांद्याच्या दरातील सुधारणा कायम

गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात तेजी आहे. बुधवारीही पुन्हा तीच परिस्थिती राहिली. कांद्याची आवक बुधवारी जेमतेम १० ते २० गाड्याच झाली. कांद्याची सर्व आवक बाहेरील जिल्ह्यातूनच झाली. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये असा दर मिळाला.

इतर बाजारभाव बातम्या
जळगावात कोबी १५०० ते २८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
सोलापुरात कोथिंबीर, मेथी, शेपूला उठावसोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
औरंगाबादेत लिंबांना ३५०० ते ४००० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोयाबीनची आवक सुरूनागपूर : बाजारात हंगामातील नव्या सोयाबीनची आवक...
गुलटेकडीत भाजीपाल्याची आवक आणि मागणी...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत ढोबळी मिरची ३००० ते ३२००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत वांगी प्रतिक्विंटल २००० ते ३०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
‘मार्केट यार्डातून हळद न उचलणाऱ्या...हिंगोली : ‘‘हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
राज्यात सोयाबीन २३५० ते ३९०० रुपये...नांदेड, परभणीत ३१५० ते ३४५० रुपयांचा दर नांदेड...
जळगावात वांगी १४०० ते २८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
जळगाव बाजार समितीत मुगाचे दर टिकूननगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या...
नाशिकमध्ये आल्याच्या आवकेत वाढ, दरातही...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
सोलापुरात टोमॅटो, बटाटा तेजीतसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
गाजराच्या दरात सुधारणा; दुधी भोपळ्यात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये हिरवी मिरची ८०० ते १४००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भुईमूग प्रतिक्विंटल ४००० ते ६०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
बऱ्हाणपुरात केळीला २३०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः मध्य प्रदेशात केळीची काढणी जवळपास संपली...
राज्यात कांदा १२०० ते ३६०० रुपये...पुण्यात मागणीत घट, दरही कमी पुणे : केंद्र...
सोलापुरात टोमॅटो २०० ते २५०० रुपये...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
जळगावात मेथी २००० ते ३४०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.१...