agriculture news in Marathi tommorow monsoon will reach in Delhi Maharashtra | Agrowon

मॉन्सून उद्या दिल्लीत 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 14 जून 2021

नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने उत्तरेत प्रगती करत आहेत. रविवारी (ता. १३) मॉन्सून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगालच्या अनेक भागांत दाखल झाला आहे.

पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने उत्तरेत प्रगती करत आहेत. रविवारी (ता. १३) मॉन्सून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगालच्या अनेक भागांत दाखल झाला आहे. उद्या (ता. १५) दिल्ली, हरियाना, आणि पंजाबपर्यंत मजल मारण्याचे संकेत हवामान विभागाच्या सूत्रांनी दिले. त्यानंतर लवकरच मॉन्सून देश व्यापणार असल्याचे स्पष्ट केले. 

महाराष्ट्रात ५ जून रोजी मॉन्सून दाखल झाल्यानंतर जवळपास पाच दिवसांत महाराष्ट्र व्यापला होता. त्यानंतर वेगाने उत्तरेकडे मजल मारत ईशान्य भारतातील काही राज्यांत चाल करत दिल्लीकडे कूच केली आहे. शनिवारी (ता.१२) बंगालच्या उपसागर, ओडिशाचा काही भाग, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारच्या काही भागांत प्रगती केली असून हळूहळू पुढे वाटचाल करत आहे. आज मॉन्सून उत्तर भारतातील राज्यात प्रगती करण्याची शक्यता आहे. 

सध्या मॉन्सूनचा प्रवास वेगाने सुरू आहे. रविवारी (ता.१३) मध्य प्रदेशासह, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, गिलगीत-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, उत्तर हरियाना, चंडिगढ आणि उत्तर पंजाबपर्यंत मॉन्सूनने मुसंडी मारली आहे. मॉन्सूनने दीव, सुरत, नंदूरबार, भोपाळ, नाऊगाऊ, हमिरपूर, बाराबंकी, बरेली, शहारानपूर, अंबाला आणि अमृतसरपर्यंत मजल मारली आहे. मॉन्सूनला पुढे 
सरकण्यासाठी आणखी पोषक वातावरण आहे. त्यामुळे आणखी काही भागांत दाखल होण्याचे संकेत आहे. अनेक भागांत मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. 
 

 
 


इतर अॅग्रो विशेष
मानवनिर्मित आपत्ती!राज्यात बेफामपणे कोसळणाऱ्या पावसाने सगळीकडे एकच...
दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसानपुणे : राज्यातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप...
मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...शिरपूर, जि. धुळे : जिल्ह्यात अनेक भागांत मका...
कोकणात पावसाची शक्यता पुणे : बंगालचा उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
कोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी...कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती...
शेतकरी संसदेत आज ‘महिला राज’ नवी दिल्ली ः मोदी सरकारचे तीन कृषी कायदे रद्द...
आंदोलनादरम्यान एकही शेतकरी मृत्यूची...नवी दिल्ली ः केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात...
थेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘...अमरावती : विमा कंपनीच्या प्रतिनिधीने खोटी माहिती...
सर्वंकष आढावा घेऊन नुकसान भरपाई जाहीर...रत्नागिरी : ‘‘तुम्हाला पायावर उभे करण्यासाठी...
बहुपीक पद्धतीतून साधले नफ्याचे सूत्रकोल्हापूर जिल्ह्यातील शेंडूर (ता. कागल) येथील...
पावसाची उघडीप; पूरस्थिती कायम पुणे : कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुण्यासह...
सांगलीत चौदा हजार जनावरांचे स्थलांतरसांगली : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर पट्यातील...
कोसळलेला प्रसंग मोठा; तुमचं पुनर्वसन...मुंबई ः तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे....
पावसाचा जोर पंधरा दिवस कमी राहण्याची...पुणे : मुसळधार पावसाने रत्नागिरी, रायगडसह,...
नऊ जिल्हे अतिवृष्टिबाधित मुंबई ः कोकण आणि पश्‍चिम महाराष्‍ट्रातील ९ जिल्हे...
वाशीम जिल्ह्यात ६९९ कोटींचे पीककर्ज वाटपवाशीम : जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना...
कोल्हापुरात पुराची भीती कायम कोल्हापूर : पावसाने शनिवारी (ता.२४) दुपारपर्यंत...
उपलोकायुक्त, सचिव, आयुक्तांनी सांगूनही...पुणे ः जलयुक्त शिवार अभियानावर खर्च दाखवलेल्या...
शेतीला मिळाली दुग्ध प्रक्रियेची जोडघोटावडे (ता. मुळशी, जि. पुणे) प्रियांका जालिंदर...
तुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...