Agriculture news in marathi A ton of vegetables, fruits for sale in Parbhani | Agrowon

परभणीत एक टनावर भाजीपाला, फळांची विक्री

टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 एप्रिल 2020

‘लॅाकडाऊन’मुळे शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांना भाजीपाला, फळांची विक्री केली जात आहे. त्याचा अधिक 
फायदा होत आहे. आगामी काळात शेतकऱ्यांनी काढणी आणि विक्रीच्या जबाबदारींची विभागणी करुन थेट भाजीपाला विक्री सुरु ठेवणे गरजेचे आहे. 
- के. आर. सराफ, प्रकल्प उपसंचालक, 
आत्मा, परभणी. 


गेल्या सहा दिवसांपासून परभणी शहरातील दोन वसाहतींमध्ये भाजीपाल्याची विक्री करत आहोत. ताजा भाजीपाला मिळत असल्यामुळे नागरिकांचा प्रतिसाद वाढला आहे. 
- दिलीप अंभुरे, अध्यक्ष, वर्णेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी, वर्णा, ता. जिंतूर, जि. परभणी 

परभणी : ‘लॅाकडाऊन’च्या काळात शेतकऱ्यांना फळे, भाजीपाला विक्री करण्यासाठी कृषी विभागातर्फे (आत्मा) ‘शेतकरी ते ग्राहक’ या उपक्रम राबविला जात आहे. जिल्ह्यातील ८४ शेतकरी गटांनी शनिवार (ता.२८) ते मंगळवार (ता.७) या कालावधीत ९५ ठिकाणी ३ हजार ३५१ क्विंटल भाजीपाला, फळांची विक्री केली, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

‘लॅाकडाऊन’मुळे शेतकऱ्यांना भाजीपाला, फळांच्या विक्रीस येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मंगेश सुरवसे, ‘आत्मा’चे उपसंचालक के. आर. सराफ, ‘पणन’चे जिल्हा व्यवस्थापक पंकज चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आत्मा’अंतर्गंत शेतकरी गट स्थापन केले आहेत. शनिवार (ता.२८) पासून जिल्ह्यात ‘शेतकरी ते ग्राहक’ भाजीपाला विक्रीस सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी २५ गटांनी जिल्ह्यातील १५ ठिकाणी ७० क्विंटल भाजीपाला, फळांची विक्री केली. 

मंगळवार (ता.७) पर्यंत शेतकरी, शेतकरी गटांची संख्या ८४ पर्यंत वाढली आहे. परभणी तालुक्यातील ३, जिंतूरमधील २७, सेलूतील ६, मानवतमधील १६, पाथरीतील ४, मानवतमधील १६, सोनपेठमधील ५, गंगाखेडमधील ७, पालममधील ८, तर पूर्णा तालुक्यातील ८ शेतकरी गट अशा एकूण ८४ गटांतर्फे ९५ ठिकाणी ३ हजार ३५१ क्विंटल भाजीपाला, फळांची विक्री केली आहे. वर्णेश्वर शेतकरी उत्पादक कंपनीतर्फे शनिवार (ता.४) पासून परभणी शहरातील शिवाजी नगर आणि कल्याण नगरयेथे भाजीपाल्याची विक्री केली जात आहे. 

दहा वाहन परवाने वितरित 

कृषी विभाग, ‘आत्मा’तर्फे अर्ज केलेल्यांना प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून शेतमाल वाहतुकीसाठी ई पास दिले जात आहेत. आजवर जीवनावश्यक वस्तुच्या वाहतुकीसाठी २३० वाहन परवाने देण्यात आले आहेत. ‘आत्मा’अंतर्गंत शेतकरी, शेतकरी गटांना १० वाहन परवाने देण्यात आले. भाजीपाला-फळे विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना परवाने देण्याची प्रक्रिया गतीमान आणि सुलभ करण्याची गरज आहे. 

 


इतर ताज्या घडामोडी
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...
कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...
काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी...
नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...
पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...
नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...
 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...
पानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...
जत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली  ः जत तालुक्यातील सात गावांमधील...
अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...
ऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...
केंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...
दक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...
आदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...
सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...
जळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...