agriculture news in marathi torrent to Peth, Trimbakeshwar | Page 3 ||| Agrowon

पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधार

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 जुलै 2021

नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ, त्र्यंबकेश्वर तालुक्यात अतिवृष्टी झाली. पेठ तालुक्यात गुरुवारी (ता. २२) ३१५ मि.मी. इतक्या विक्रमी पावसाने थैमान घातले.

नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ, त्र्यंबकेश्वर तालुक्यात अतिवृष्टी झाली. पेठ तालुक्यात गुरुवारी (ता. २२) ३१५ मि.मी. इतक्या विक्रमी पावसाने थैमान घातले. तालुक्याच्या विविध भागात अतिवृष्टीमुळे भात उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. 

भात उत्पादक पट्ट्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होते. रविवार (ता.१९) पासून पावसाने जिल्ह्याच्या विविध भागात हजेरी लावली. त्यात पश्चिम भागात पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर दिसून आला. 

पेठ व त्रंबकेश्वर तालुक्यात पावसाचे थैमान पाहायला मिळाले. बऱ्याच गावांतील संपर्क तुटला होता. अनेक शेतकऱ्यांनी थोड्याफार पावसावर भात रोपे तयार केली होती. तर काहींनी लागवडी केल्या होत्या. मात्र पाऊस अधिक असल्याने भाताच्या खाचारात पाणी तुंबून बांध फुटले. त्यामुळे भात रोपे व लागवडी वाहून 
गेल्या. 

पेठ तालुक्यातील इनामबारी, श्रीमंत, हरणगाव, लिंगवणे, शिंदे, पाटे हे लघु पाटबंधारे गेल्या तीन दिवसांच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भरले. मात्र रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. आदिवासी भागात अनेक गावांचा संपर्क तुटला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. गेल्या काही वर्षात विक्रमी पाऊस झाल्याचे येथील स्थानिकांनी सांगितले.

वाड्या-वस्त्यांचा संपर्क तुटला

पेठकडून हरसूलकडे जाणारा भुवन घाट रस्त्यावर व करंजाळीकडून हरसूलकडे जाणारा वाघ्याचा बारीचा घाट दरड कोसळल्यामुळे बंद झाला होता. त्यामुळे वाड्या-वस्त्यांचा संपर्क तुटला. या भागातील दमणगंगा नदी दुथडी भरून वाहिली. पहिल्याच झालेल्या पावसामुळे नदी भरून वाहिल्याचे पाहायला मिळाले. अनेक छोट्या पाड्यांवर जाणारे रस्त्यांच्या मोठया पाण्याच्या प्रवाहामुळे खचल्याने वाहून गेल्या आहेत. 
 


इतर बातम्या
कोकणात पावसाची दमदार हजेरीपुणे : राज्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे....
द्राक्षशेतीत परीक्षणानंतर...पुणे ः ‘‘अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन उत्तमरीत्या...
‘अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना  हेक्टरी...परभणी : अतिवृष्टीमुळे जमिनी खरडून गेल्या आहेत....
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला...
ज्वारी पेरली तर खरी,  पण वाचवायची कशी? अकोला : गेल्या काही वर्षांत सातत्याने ज्वारीचे...
‘कृषी’ शिक्षक म्हणून कृषी, संलग्न ...कोल्हापूर : शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश...
द्राक्ष बागायतदार संघाचे आजपासून ६१ वे...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे...
पुरंदरमध्ये लवकरच प्रॉपर्टी कार्ड : ...गराडे, जि. पुणे : स्वामित्व योजना...
आमच्या गावाला ग्रामपंचायत द्या...गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील रवी व मुल्लुरचक या...
मूग, सोयाबीन पिकाला कोंब फुटण्याची...पुणे : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
पुणे जिल्ह्यात तुरळक  ठिकाणी हलक्या...पुणे : दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरण...
एकरकमी एफआरपीसाठी  भारतीय किसान संघाचे...पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त व किफायतशीर...
नगरला कांदा दरात  चढ-उतार सुरूच नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी  कुरुंदवाडमध्ये...कोल्हापूर : महापूर ओसरून दीड महिना झाला असून,...
शिसोदे समितीची आज तातडीची बैठकपुणे ः जलयुक्त शिवार कामांमध्ये झालेल्या कोट्यवधी...
सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी...पुणे ः ‘‘बदलत्या परिस्थितीत सामाजिक आणि मानसिक...
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
‘व्हीएसआय’च्या जालना केंद्रासाठी ३० कोटीपुणे ः विदर्भ, मराठवाड्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या...
अखेर ‘चोसाका’ला मिळाली नवसंजीवनीचोपडा, जि. जळगाव  : ‘‘चोपडा शेतकरी सहकारी...