नाशिक जिल्ह्यात पुन्हा मुसळधार

नाशिक जिल्ह्यात पुन्हा मुसळधार
नाशिक जिल्ह्यात पुन्हा मुसळधार

नाशिक : सलग तिसऱ्या दिवशी शहर परिसर व ग्रामीण भागात झालेल्या मुसळधार पाऊस झाला. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे नदीपात्रातील पाणीपातळीत अचानक वाढ झाली. त्यामुळे गोदावरी काठच्या नागरिकांची मोठी धावपळ उडाली. गंगापूर धरणाच्या परिसरात बुधवार (ता. २५) सायंकाळपर्यंत १०२, तर पाणलोट क्षेत्रातील कश्यपी परिसरात ८४ मि.मी. पावसाची नोंद झाली. धरणात पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक होऊ लागल्याने धरणातून १ हजार ७१३ क्युसेक इतका विसर्ग केला गेला. तसेच आळंदी धरणातून ६८७, कश्यपीमधून ४२२ व गौतमी गोदावरीमधून १०४ क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठी पूरस्थिती निर्माण झाली होती.  धरणांतून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे गोदावरीच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाली. सायखेडा गावात काठा शेजारील शेतात शिरले. शिंगवे शिवारात पुराचे पाणी शिरले. मागील महिन्यात आलेल्या महापुराचे पाणी अद्यापही काही शेतात साचलेले असताना पुन्हा पुराचे पाणी शेतात आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पावसाने हजेरी लावल्याने गंगाघाटावर भरणारा बुधवारचा आठवडे बाजार पूर्णपणे विस्कळित झाल्याचे चित्र दिसून आले. पावसाने जोरदार हजेरी लावल्याने भाजीपाला विक्रे त्यांसह भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची चांगलीच धावपळ झाली. 

द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत  निफाड, दिंडोरी, बागलाण, चांदवड, सिन्नर तालुक्यांत पावसाचा जोर होता. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांना मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी ज्या द्राक्ष बागांच्या छाटण्या झाल्या आहेत अशा भागांतील पोंगा अवस्थेतील बागा व नवीन पाने आलेल्या बागा पावसाच्या तडाख्यात सापडल्या आहेत. त्यामुळे द्राक्ष हंगामावर मोठा परिणाम होईल. तसेच टोमॅटो लागवडींना फुलगळीचा फटका बसला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com