Agriculture news in marathi The torrential downpour continues in Sindhudurg | Agrowon

सिंधुदुर्गात मुसळधार सुरूच, पुरस्थिती कायम

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 जुलै 2020

सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात पुरस्थिती कायम आहे. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका कसाल, ओरोस (ता.कुडाळ) भागाला बसला आहे.

सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात पुरस्थिती कायम आहे. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका कसाल, ओरोस (ता.कुडाळ) भागाला बसला आहे. आतापर्यंत १६ हुन अधिक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. या भागातील २५ घरांमध्ये पुराचे पाणी भरले आहे. अनेक मुख्य मार्गांवरील पुलावरून पुराचे पाणी वाहत आहे. त्यामुळे वाहतुक ठप्प, तर जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. बुधवारी (ता. ८) सकाळपासून पावसाचा जोर अधिकच वाढला. सावंतवाडी, कुडाळ, मालवण, कणकवली या तालुक्यांना पावसाने अक्षरक्ष झोडपून काढले. गुरूवारी (ता.९) सकाळपासून पुन्हा मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुरस्थिती कायम आहे. कुडाळ तालुक्यातील कसाल, ओरोस या परिसराला पुराचा मोठा तडाखा बसला आहे. महामार्गालगतच्या या परिसराला पाण्याने वेढले आहे. या भागात नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

सुमारे २५ हुन अधिक घरांमध्ये पाणी घुसले आहे. १६ कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलविले आहे. महामार्गाच्या भरावामुळेच ही परिस्थिती ओढवली असल्याचे स्थानिकांचे मत आहे.

पुराच्या पाणी शेती, बागायतीमध्ये घुसल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. नांदगाव (ता. कणकवली) परिसरात पुरामुळे भातशेतीचे  नुकसान झाले. पाण्याचा प्रवाह वाढत असल्यामुळे आणखी नुकसानीची शक्यता आहे. शुक आणि शांती नदी तुडुंब भरून वाहत असल्यामुळे खारेपाटण शहरात पुरस्थितीची शक्यता आहे. घरे, गोठ्यांची भिंती कोसळण्याचे प्रकार देखील घडले आहेत. पावसामुळे नुकसानीचे पंचनामे करण्यात व्यत्यय येत आहे.
 


इतर अॅग्रो विशेष
बंदीची प्रक्रिया हवी  सुटसुटीत अन्...केंद्र सरकारने १८ मे रोजी २७ कीडनाशकांच्या बंदीचा...
कृषिसेवक भरतीतील गैरव्यवहारावर पांघरूण...पुणे : राज्यात २०१६ मध्ये झालेल्या कृषिसेवक भरती...
कोकण, विदर्भात मुसळधारेचा इशारा पुणे ः मध्य प्रदेश व परिसराच्या वायव्य भागात कमी...
संपूर्ण नियमनमुक्तीची अंमलबजावणी करापुणे:  सर्वच शेतमालाच्या संपूर्ण...
बाजार समिती कायद्यात बदल करण्याची मागणीपुणे: शेतमालाच्या संपूर्ण नियमनमुक्तीच्या...
भाजपच्या दूध आंदोलनापासून ‘संघर्ष समिती...नगर ः दुधाच्या दरासाठी सातत्याने आग्रही राहून...
मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरु...मुंबई: दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य होईपर्यंत...
बीटी कपाशी बियाणे अप्रमाणित ...अकोला ः या हंगामात बाजारपेठेत विक्रीसाठी आणलेल्या...
'नाबार्ड’चा व्यवस्थापक नसल्यास अग्रणी...पुणे: कृषी पायाभूत निधी योजनेला प्रत्येक...
देशातील जलसंपत्तीची माहिती आता एका...पुणे ः केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने देशभरातील...
भाजीपाला रोपांच्या मागणीत वाढकोल्हापूर: कोविडच्या संकटामुळे थांबलेल्या नव्या...
वऱ्हाडात जोरदार, मराठवाड्यात सर्वदूर...पुणे ः राज्यात पावसाने पुन्हा जोर धरण्यास सुरुवात...
`सीसीआय`कडून सहा कोटी क्विंटल कापूस...नागपूर : कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाकडून (सीसीआय)...
अकरा ‘सेन्सर्स’ सह ‘वेदर स्टेशन’ द्वारे...वडाळी नजीक (ता.निफाड, जि. नाशिक) येथील रोशन...
सदोष बियाण्यांत शेतकरी दोषी कसा? सोयाबीनच्या सदोष बियाण्यांचा विषय यंदा...
बियाणे दहशतवाद गंभीरच!तणनाशक सहनशील अवैध एचटीबीटी कापूस बियाण्याच्या...
कोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसासाठी...
मराठवाड्यात कपाशी लागवडीत सव्वा लाख...औरंगाबाद : मराठवाड्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या...
सूक्ष्म सिंचन प्रस्तावांना पूर्वसंमतीची...अकोला ः  कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा...
साडेतीन हजार शेतकऱ्यांना शेतमाल तारण...पुणे ः शेतमालाच्या काढणीनंतर बाजारपेठेत एकाचवेळी...