मुसळधार पावसाचा खेड, चिपळूणला तडाखा

मुसळधार पावसाचा खेड, चिपळूणला तडाखा
मुसळधार पावसाचा खेड, चिपळूणला तडाखा

रत्नागिरी ः मुसळधार पावसाचा धुमाकूळ रत्नागिरी जिल्ह्यात सुरूच आहे. सर्वाधिक फटका खेड, चिपळूण तालुक्याला बसला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवरील पूल रात्री बंद ठेवण्यात आला होता. तर चिपळूण बाजारपेठेसह खेर्डी गाव जलमय झाले होते. }रस्त्यावरील गाड्या पुराच्या पाण्यात अडकून पडल्या होत्या, तर दुकानांमध्येही पाणी घुसल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. पावसामुळे चिपळूणमधील जनजीवन विस्कळित झाले आहे. शनिवारी (ता. २७) सकाळी पावसाने उघडीप दिल्यामुळे खेर्डीतील पाणी ओसरण्यास सुरुवात झाली होती. जिल्ह्यात सरासरी १४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी (ता. २७) सकाळी ८.३० वाचेपर्यंतच्या चोवीस तासात झालेला पाऊस (मिलिमीटर) ः मंडगणडला २०५, दापोली २२७, खेड १९०, गुहागर ९३, चिपळूण २३५, संगमेश्‍वर १६६, रत्नागिरी ३१, लांजा १०४, राजापूर ७२. 

२००५ ची पुनरावृत्ती  शुक्रवारी (ता. २६) रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसाने चिपळूण शहरासह किनारी भागातील ग्रामपंचायतींना चांगलाच तडाखा बसला. २००५ साली थरकाप उडवणारा महापूर चिपळूणमध्ये आला होता. त्याचीच पुनरावृत्ती यंदा झाला आहे. रात्री एक वाजण्याच्या सुमारास पाणी वाढायला सुरुवात झाली. वाशिष्टी नदीला पूर आल्याने चिपळूण शहरासह परिसरातील विविध भागांत पुराचे पाणी घुसले. ग्रामस्थांना याची कल्पना देण्यासाठी प्रशासनाकडून तत्काळ पावले उचलण्यात आल्याचे तहसीलदार जीवन देसाई यांनी सांगितले. वाशिष्ठी नदीच्या पुराचे चिंचनाका, बाजारपेठ, बस स्थानक, पेठमाप, मुरादपूर, खेर्डी, जुना भैरी मंदिर आदी विविध भागात पाणी घुसले. परिणामी शेकडो लोकांनी रात्र जागून काढली. चिपळूण- कराड मार्गावर खेर्डी येथे पाणी आले होते. परिणामी चिपळूणकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली, खेर्डीत माळेवाडी, विकासवाडी, खतातवाडी, विठ्ठलवाडी आदी भागात पुराचे पाणी घुसले. दुसऱ्या मजल्यावर लोकांनी आश्रय घेतला. पुरामुळे चिपळूण, खेर्डी, परिसरात शाळांना सुटी देण्यात आली होती. दुकानेच्या दुकाने अर्धी अधिक पाण्यात गेल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास चिपळूणला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com