Agriculture news in Marathi A torrential downpour in Konkan, Central Maharashtra | Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 सप्टेंबर 2021

पोषक हवामानामुळे राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज आहे. आज (ता. १४) कोकणात बहुतांशी ठिकाणी तर उर्वरित राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, कोकणात  मुसळधार तर राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

पुणे : पोषक हवामानामुळे राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज आहे. आज (ता. १४) कोकणात बहुतांशी ठिकाणी तर उर्वरित राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, कोकणात  मुसळधार तर राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे कायम असून, गुजरातच्या नालियापासून कमी दाब क्षेत्र, खांडवा, बालाघाट, रायपूर, संभाळपूर ते बंगालच्या उपसागरातील कमी तीव्रतेच्या वादळापर्यंत (डीप डिप्रेशन) सक्रिय आहे. तर मॉन्सूनच्या आसाला समांतर असलेला कमी दाबाचा पट्टा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशापर्यंत ते डीप डिप्रेशनपर्यंत कायम आहे.

कमी तीव्रतेचे वादळ निवळणार
बंगालच्या उपसागरातील ठळक कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून ओडिशाच्या किनारपट्टीलगत कमी तीव्रतेच्या वादळाची (डीप डिप्रेशन) निर्मिती झाली आहे. ही प्रणाली जमिनीवर आली असून, ती ओडिशाच्या किनाऱ्यावरील चांदबलीपासून पश्चिमेकडे २० किलोमीटर अंतरावर होती. छत्तीसगड मध्य प्रदेशकडे सरकत असलेल्या या प्रणालीची तीव्रता कमी होत आहे. तर गुजरात आणि परिसरावरही आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे.

राज्यात दोन दिवस पावसाचा जोर राहण्याची शक्यता असून, आज (ता. १४) कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. 

मुसळधार पावसाचा 
इशारा (ऑरेंज अलर्ट)

कोकण : पालघर.
मध्य महाराष्ट्र : नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर.
जोरदार पावसाचा इशारा (एलो अलर्ट)
कोकण : मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी.
मध्य महाराष्ट्र : धुळे, नंदूरबार.
मराठवाडा : जालना, परभणी, हिंगोली.
विदर्भ : अकोला, अमरावती.
विजांसह पावसाचा इशारा (एलो अलर्ट) ः विदर्भ : वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा.


इतर बातम्या
‘अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना  हेक्टरी...परभणी : अतिवृष्टीमुळे जमिनी खरडून गेल्या आहेत....
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला...
ज्वारी पेरली तर खरी,  पण वाचवायची कशी? अकोला : गेल्या काही वर्षांत सातत्याने ज्वारीचे...
‘कृषी’ शिक्षक म्हणून कृषी, संलग्न ...कोल्हापूर : शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश...
द्राक्ष बागायतदार संघाचे आजपासून ६१ वे...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे...
पुरंदरमध्ये लवकरच प्रॉपर्टी कार्ड : ...गराडे, जि. पुणे : स्वामित्व योजना...
आमच्या गावाला ग्रामपंचायत द्या...गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील रवी व मुल्लुरचक या...
मूग, सोयाबीन पिकाला कोंब फुटण्याची...पुणे : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
पुणे जिल्ह्यात तुरळक  ठिकाणी हलक्या...पुणे : दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरण...
एकरकमी एफआरपीसाठी  भारतीय किसान संघाचे...पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त व किफायतशीर...
नगरला कांदा दरात  चढ-उतार सुरूच नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी  कुरुंदवाडमध्ये...कोल्हापूर : महापूर ओसरून दीड महिना झाला असून,...
शिसोदे समितीची आज तातडीची बैठकपुणे ः जलयुक्त शिवार कामांमध्ये झालेल्या कोट्यवधी...
सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी...पुणे ः ‘‘बदलत्या परिस्थितीत सामाजिक आणि मानसिक...
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
‘व्हीएसआय’च्या जालना केंद्रासाठी ३० कोटीपुणे ः विदर्भ, मराठवाड्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या...
अखेर ‘चोसाका’ला मिळाली नवसंजीवनीचोपडा, जि. जळगाव  : ‘‘चोपडा शेतकरी सहकारी...
पूर्व विदर्भात पावसामुळे हाहाकार नागपूर : पूर्व विदर्भातील भंडारा आणि नागपूर...
पोषक आहाराबद्दल जागरूकता महत्त्वाची :...सोलापूर ः ‘‘आपल्या सर्वांसाठी पोषक आहार आवश्यक...