Agriculture news in marathi Torrential downpour in Pangri area Beat soybean crops | Page 2 ||| Agrowon

पांगरी परिसरात मुसळधारेचा सोयाबीन पिकांना तडाखा

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 सप्टेंबर 2021

पांगरी, ता. बार्शी ः पांगरी भागात शुक्रवारी (ता. २४) रात्री बारा वाजेपासून पाऊस सुरू झाला. मुसळधार पावसाने सकाळी शनिवारी (ता.२५) सहा वाजेपर्यंत झोडपून काढले. परिसरातील सर्व नदी-नाल्यांना पूर आला. त्यामुळे काढून पडलेले सोयाबीन, उडीद पिकास फटका बसला. तर अनेक ठिकाणी काढणीस आलेले सोयाबीन पाण्यात गेले.

 पांगरी, ता. बार्शी ः पांगरी भागात शुक्रवारी (ता. २४) रात्री बारा वाजेपासून पाऊस सुरू झाला. मुसळधार पावसाने सकाळी शनिवारी (ता.२५) सहा वाजेपर्यंत झोडपून काढले. परिसरातील सर्व नदी-नाल्यांना पूर आला. त्यामुळे काढून पडलेले सोयाबीन, उडीद पिकास फटका बसला. तर अनेक ठिकाणी काढणीस आलेले सोयाबीन पाण्यात गेले. शेतांना तळ्याचे स्वरूप आले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

मुसळधारेमुळे अनेक गावांचा काही काळासाठी संपर्क तुटला होता. यंदाच्या मान्सूमधील पहिला मुसळधार पाऊस आहे. अद्यापपर्यंत नदी-नाल्यांना पूर आला नव्हता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरु होता.

शुक्रवारी मात्र जोरदार पाऊस बरसला. उक्कडगाव येथील नागोबा नदीला पूर आला. त्यामुळे पांगरीकडे येण्याचा संपर्क तुटला होता. दुपारपर्यंत पुराचे पाणी कमी न झाल्याने लोकांना पांगरीकडे ये-जा करता आली नाही. येरमाळ्याकडे जाण्यासाठी मोती खाण नदीला मोठ्याप्रमाणात पुराचे पाणी आले. त्यामुळे त्या बाजूचा ही संपर्क तुटला होता. पांढरी येथील पाझर तलावाचे साठवण तलावात रूपांतर झाल्याने उंची वाढविण्याचे काम चालू आहे. 

  शेतकऱ्यांची तारांबळ

घोळवेवाडी येथील नीलकंठा नदीला देखील पूर आला. चिंचोली येथील नीलकंठा नदीवरील सर्व बंधाऱ्यांवरून पाणी वाहिले. दोन वर्षांपूर्वी पाणी फाउंडेशनतर्फे निर्माण केलेल्या खड्ड्यात, चरींमध्ये पाणी साठून राहिले आहे. या दमदार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांना मात्र मोठा दणका बसला आहे. काढणीस आलेले व काढलेल्या सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिपक्व सोयाबीन पीक काढण्यासाठी  शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे. 
 


इतर बातम्या
विपरीत परिस्थितीत तग धरणाऱ्या...नागपूर ः दुष्काळी भागात नाचणी पीक तग धरू शकते....
जतमध्ये यंदा मुबलक पाणीसाठा सांगली : जत तालुक्यात २७ प्रकल्प असून, २५३७.८२...
बटाटा वाणाचे भाव तेजीत मंचर, जि. पुणे : बाजार समितीच्या आवारात मराठवाडा...
दिवाळीनंतरच कृषी महाविद्यालये गजबजणारपुणे ः राज्यात कोविडमुळे बंद पडलेले कृषी...
यूपी सरकारची भूमिका वेळकाढूपणाचीनवी दिल्ली ः उत्तरप्रदेशातील लखीमपूर खिरी येथील...
नांदेड जिल्ह्यात रब्बीत साडेतीन लाख...नांदेड : जिल्ह्यात आगामी रब्बी हंगामात पेरणी...
एफआरपीपेक्षा  जादा दर मिळणार?कोल्हापूर : प्रति वर्षीप्रमाणे यंदाही स्वाभिमानी...
नांदेड जिल्ह्यातील वीस हजार शेतकरी...नांदेड : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
जिरायत, बागायत जमीन विक्रीवरील निर्बंध ...नाशिक : ‘‘शासनाच्या नव्या धोरणानुसार जमीन...
चंदन लागवडीला प्रोत्साहन; अगरबत्ती...मुंबई : चंदन लागवडीला प्रोत्साहन देणे तसेच...
धुळे : अमरिश पटेल यांचा बिनविरोधसाठी... धुळे : बहुचर्चित धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती...
परभणी जिल्ह्यात कापसाला किमान सात हजार...परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील खासगी कापूस...
खानदेशात रब्बीची पेरणी २०० टक्के होणे...जळगाव ः खानदेशात रब्बी पेरणीची तयारी सुरू झाली...
‘महावितरण’ची थकबाकी वसुली अत्यावश्यक :...नाशिक : ‘‘वीजनिर्मिती कंपन्यांकडून वीज विकत घेऊन...
परराज्यांतील भात रोखा : मंत्री छगन भुजबळ गडचिरोली :  परराज्यांतील भात (धान) चोरट्या...
शिरपूर तालुक्यात आठ बंधाऱ्यांच्या...शिरपूर, जि. धुळे : तालुक्यातील बोरगाव, जातोडा आणि...
पावसाची उघडीप राहणारपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
हरभरा बियाणे वितरणासाठी कृषी विभागाची...पुणे ः राज्यातील रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र...
इथेनॉलनिर्मिती १५० कोटी लिटरच्या पुढे...पुणे ः राज्याची एकूण इथेनॉलनिर्मिती क्षमता येत्या...
‘सिबिल’वर ठरतेय कर्जदाराची पतसोलापूर : रिझर्व्ह बॅंकेच्या निकषांनुसार आता...