मुसळधार पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला झोडपले

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्याच्या काही भागात सोमवारी (ता. १४) मुसळधार पावसाने झोडपून काढले. बांदा शहरात पाणीच पाणी असून, काही दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे तारांबळ उडाली.
मुसळधार पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला झोडपले With torrential rain Sindhudurg district was razed
मुसळधार पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला झोडपले With torrential rain Sindhudurg district was razed

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्याच्या काही भागात सोमवारी (ता. १४) मुसळधार पावसाने झोडपून काढले. पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला. बांदा शहरात पाणीच पाणी असून, काही दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे तारांबळ उडाली. काही ठिकाणी शेतीत पाणी घुसून नुकसान झाले. पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. जिल्ह्यात गेले तीन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. सोमवारी जिल्ह्यातील दोडामार्ग, वेंगुर्ला, कुडाळ, मालवण या तालुक्यांना पावसाने चांगलेच झोडपले. या चार तालुक्यांत १३० मि.मी पेक्षा अधिक पाऊस झाला. तर उर्वरित सावंतवाडी, देवगड, कणकवली तालुक्यात देखील जोरदार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले. बांदा शहरात पूरस्थिती सदृशस्थिती निर्माण झाली. शहरात जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले होते. येथील काही भागात तीन फुटापर्यंत पाणी रस्त्यावर होते. त्यामुळे नागरिकांना त्या पाण्यातून वाट काढत घरचा रस्ता धरावा लागला. कामगाराच्या झोपडीमध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळे त्यांना सुरक्षितस्थळी नेऊन ठेवण्यात आले. बांदा-दोडामार्ग रस्त्यावर देखील पुराचे पाणी होते. त्यामुळे मार्गावरील वाहतूक देखील ठप्प  झाली होती.  ओरोस येथे महामार्ग चौपदरीकरणाच्या लगतच्या शेती, बागायतीमध्ये पुराचे पाणी शिरले होते. दरम्यान मंगळवार (ता. १५) सकाळपासून देखील जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू होता. कुडाळ तालुक्यातील होडावडे पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. डिग्रस जाधववाडी येथील पुलावरून देखील पुराचे पाणी वाहत आहे. त्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर  झाडे कोसळल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com