Agriculture news in marathi With torrential rain Sindhudurg district was razed | Page 3 ||| Agrowon

मुसळधार पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला झोडपले

टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 जून 2021

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्याच्या काही भागात सोमवारी (ता. १४) मुसळधार पावसाने झोडपून काढले.  बांदा शहरात पाणीच पाणी असून, काही दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे तारांबळ उडाली.

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्याच्या काही भागात सोमवारी (ता. १४) मुसळधार पावसाने झोडपून काढले. पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला. बांदा शहरात पाणीच पाणी असून, काही दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे तारांबळ उडाली. काही ठिकाणी शेतीत पाणी घुसून नुकसान झाले. पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.

जिल्ह्यात गेले तीन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. सोमवारी जिल्ह्यातील दोडामार्ग, वेंगुर्ला, कुडाळ, मालवण या तालुक्यांना पावसाने चांगलेच झोडपले. या चार तालुक्यांत १३० मि.मी पेक्षा अधिक पाऊस झाला. तर उर्वरित सावंतवाडी, देवगड, कणकवली तालुक्यात देखील जोरदार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले. बांदा शहरात पूरस्थिती सदृशस्थिती निर्माण झाली. शहरात जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले होते.

येथील काही भागात तीन फुटापर्यंत पाणी रस्त्यावर होते. त्यामुळे नागरिकांना त्या पाण्यातून वाट काढत घरचा रस्ता धरावा लागला. कामगाराच्या झोपडीमध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळे त्यांना सुरक्षितस्थळी नेऊन ठेवण्यात आले. बांदा-दोडामार्ग रस्त्यावर देखील पुराचे पाणी होते. त्यामुळे मार्गावरील वाहतूक देखील ठप्प 
झाली होती.

 ओरोस येथे महामार्ग चौपदरीकरणाच्या लगतच्या शेती, बागायतीमध्ये पुराचे पाणी शिरले होते. दरम्यान मंगळवार (ता. १५) सकाळपासून देखील जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू होता. कुडाळ तालुक्यातील होडावडे पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. डिग्रस जाधववाडी येथील पुलावरून देखील पुराचे पाणी वाहत आहे. त्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर 
झाडे कोसळल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.


इतर ताज्या घडामोडी
अकोला, वाशीम जि.प.,पंचायत समिती...अकोला ः जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त...
आठवडी बाजार सुरू करा : मुनगंटीवारचंद्रपूर ः राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव...
शिवसेनेचे शिष्टमंडळ लखीमपूरला जाणार;...नवी दिल्ली : लखीमपूर खेरी येथील हिंसा आणि...
सांगलीत १० ते १५ टक्क्यांनी सोयाबीनचे...सांगली ः जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या...
शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी...लखनौ ः लखीमपूरमधील हिंसाचारानंतर राज्य...
लखीमपूर खेरीतील हिंसाचार...नवी दिल्ली ः शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या लखीमपूर...
पुणे जिल्ह्यातील पशुधन बाजार बंदपुणे ः केंद्र सरकारकडून वेळेत लसींचा पुरवठा न...
देशांतर्गत कडधान्य उत्पादनवाढ गरजेचीपुणे : गेल्या तीन दशकांत कडधान्य लागवड आणि...
मागणी वाढल्याने उन्हाळ  कांदा...नाशिक : जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत...
आजच्या ग्रामसभांना ग्रामसेवकांचा विरोध नगर : राज्याच्या ग्रामविकास विभागाने आज (ता. २)...
राज्य सरकारने तातडीने भरपाईचा निर्णय...नागपूर : राज्यावर मोठी नैसर्गिक आपत्ती येते....
वीजदर सवलतीबाबत उपमुख्यमंत्री सकारात्मक कोल्हापूर : राज्यातील उच्च दाब आणि लघू दाब सहकारी...
‘महानंद’ला बदनाम करण्याचे प्रयत्न : ...मुंबई : कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना ‘महानंद’...
पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे...नाशिक : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
बँकांनी कर्ज प्रकरणे वेळेत मंजूर करावीत...वाशीम : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांनी खरीप आणि...
शेतकरी आंदोलकांवर सर्वोच्च न्यायालय...नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमांवर ठाण...
‘माळेगाव कारखाना देणार  शेतकऱ्यांना ‘...माळेगाव, जि. पुणे : माळेगाव साखर कारखाना आगामी...
मुंबै बँकेची चौकशी केवळ सुडाने आणि...मुंबई ः मुंबै बँकेच्या विरोधात चौकशी करण्याचा...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...