सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार; पिकांचे नुकसान

सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार; पिकांचे नुकसान
सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार; पिकांचे नुकसान

सातारा : जिल्ह्यात गुरुवारी (ता. ३) पहाटे अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली. खटाव येथे पहाटे ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे परिसरातील नदी, ओढे व नाले दुथडी भरून वाहू लागले. या पावसामुळे काढणीला आलेली पिके भिजल्याने नुकसान होणार असून, स्ट्रॅाबेरी लागवडीच्या कामांना ब्रेक लागण्याची स्थिती आहे. 

खटाव परिसरात गुरुवारी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच पावसाचा जोर वाढला. सुमारे दीड तास पावसाने दमदार हजेरी लावल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. येथील अण्णा भाऊ साठेनगराला या पावसाचा सर्वाधिक फटका बसला. या भागातील शक्ती मोहन वायदंडे, जयसिंग गणपत वायदंडे, अलका मोहन वायदंडे, किरण नंदकुमार वायदंडे, अनिल गणपत वायदंडे यांच्या घरांत पाणी घुसले. या वेळी घरातील गृहउपयोगी साहित्य व अन्न-धान्याचे नुकसान झाले.

 वडूज परिसरातही दमदार पाऊस झाला आहे. तसेच सातारा, पाटण, जावली, महाबळेश्वर तालुक्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. ऐन सुगीच्या दिवसात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी घेवडा, मूग, सोयाबीनच्या बुचड्या लावून ठेवल्या होत्या. त्यातदेखील पाणी शिरल्याने हातातोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

सातारा, पाटण, जावली तालुक्यांत काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होणार आहे. नुकतीच महाबळेश्वर तालुक्यात सुरू झालेली स्ट्रॅाबेरी लागवड ठप्प होणार आहे. अगोदर पावसामुळे लागवडीचा कालावधी पुढे गेला असून, त्यात हा पाऊस झाल्याने स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांपुढील अ़़डचणी वाढल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com