सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस

सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस
सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात शुक्रवारी (ता. ४) पहाटेपासून  पावसाला सुरवात झाली. दुपारनंतर पावसाचे प्रमाण वाढले. सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे भातशेतीवरील संकट अधिक गडद होऊ लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, बुधवारी (ता. ३) सायंकाळी उशिरा चौकुळ येथे वीज कोसळून तीन जनावरे दगावली आहेत.

जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर कडक उन्हाच्या झळा बसत होत्या. वातावरणात प्रचंड उष्मा निर्माण झाल्यामुळे अंगाची लाहीलाही होत होती. त्यामुळे सायंकाळी पाऊस पडेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र गुरुवारी पहाटे चार वाजल्यापासून विजांच्या कडकडाटासह रिमझिम पावसाला सुरवात झाली. त्यानंतर दुपारी पुन्हा विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. हा पाऊस जिल्ह्याच्या बहुतांशी भागात सुरू होता. 

वैभववाडी, कणकवली, सांवतवाडी या भागात जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील शेकडो एकर क्षेत्रावर हळवी भात बियाण्यांची लावणी केलेली आहे. ही बियाणे सध्या कापणीला आली आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेला पाऊस पक्व असलेल्या भातशेतीकरिता नुकसानकारक ठरण्याची शक्यता आहे. एखादा दुसरा अपवाद वगळता भातकापणीला अजूनही सुरवात झालेली नाही. नवरात्रोत्सव संपल्यानंतर भातकापणीला सुरवात होणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com