राज्यात तूर ४१०० ते ५५०० रुपये प्रतिक्विंटल

Tour 4100 to 5500 rupees per quintal in the state
Tour 4100 to 5500 rupees per quintal in the state

नांदेडमध्ये प्रतिक्विंटल४५५० ते ४७०० रुपये 

 नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता. २३) तुरीची २५ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला ४५५० ते ४७०० रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदाच्या हंगामातील नवीन तुरीची आवक सुरू आहे. शनिवारी (ता. १८) तुरीची ११ क्विंटल आवक झाली. त्या वेळी तिला प्रतिक्विंटलला ४६०० ते ४६४१ रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. २१) तुरीची २४ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला ४५०१ ते ४६०० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. २२) तुरीची २५ क्विंटल आवक झाली. त्या वेळी प्रतिक्विंटलला ४५५० ते ४७०० रुपये दर मिळाले, असे बाजार समितीतील सूत्रांनी सांगितले.

सोलापुरात सर्वाधिक ५००० रुपये

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात तुरीला मागणी होती. पण आवक ही जेमतेम राहिली. त्यामुळे तुरीचे दर टिकून राहिले. तुरीला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ५००० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात तुरीची आवक ५९७  क्विंटल झाली. ही सर्व आवक स्थानिक भागातूनच बार्शी, करमाळा, मंगळवेढा, मोहोळ या भागातून झाली. गेल्या पंधरवड्यापासून आवकेचे प्रमाण चांगले आहे. या सप्ताहात तुरीला किमान ३२०० रुपये, सरासरी ४७०० रुपये आणि सर्वाधिक ५१०० रुपये असा दर मिळाला. 

या आधीच्या सप्ताहात तुरीची आवक मात्र एकदम वाढली. सर्वाधिक १२७० क्विंटलपर्यंत ही आवक राहिली. पण दर वधारलेले राहिले. किमान ३८०० रुपये, सरासरी ४६०० रुपये आणि सर्वाधिक ५२०० रुपये असा दर मिळाला. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातही आवक ५०० क्विंटलपर्यंत राहिली, तर तुरीचा दर किमान ३५०० रुपये, सरासरी ४५०० रुपये आणि सर्वाधिक ५००० रुपये मिळाला. किचिंत चढ-उतार वगळता तुरीचे दर टिकून राहिले.

जळगावात प्रतिक्विंटलला ५५०० रुपयांवर दर

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवड्यात तुरीची आवक सुरू झाली आहे. आवक रखडत सुरू आहे. गुरुवारी (ता. २३) ३५ क्विंटल आवक झाली. गावरान किंवा पारंपरिक वाणांच्या तुरीला ६००० रुपये, तर संकरित वाणांच्या तुरीला ४५०० ते ५५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.  तुरीची आवक जामनेर, भुसावळ, जळगाव, एरंडोल, धरणगाव आदी भागांतून होत आहे. बुलडाणा, जालना भागांतील तुरीची आवक अद्याप सुरू झालेली नसल्याची माहिती मिळाली. 

आवक, दर (प्रतिक्विंटल, रुपये)

तारीख आवक किमान दर कमाल दर
२३ जानेवारी ३५ ४५००  ५५००
१६ जानेवारी  २८ ४६०० ५४००

लासलगावमध्ये ४२०० ते ४६०० रुपये

नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवार (ता.२२) रोजी तुरीची आवक ६ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ४२०० ते ४८०० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ४७५१ रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

मंगळवारी (ता.२१)तुरीची आवक १ क्विंटल झाली. तिला ४७०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सोमवारी (ता.२०) तुरीची आवक १ क्विंटल झाली. तिला ४६०१ ते ४८८० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ४६५१ रूपये मिळाला. बुधवारी (ता.१६ ) तुरीची आवक १ क्विंटल झाली. त्यावेळी तिला ४६०० रुपये दर मिळाला. 

गुरुवारी (ता.१७ ) तुरीची आवक ६ क्विंटल झाली. तिला ४६०० ते ४८५१ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ४६७५ होते. जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक अत्यल्प आहे. आवक एक क्विंटलच्या आत होत आहे. चालू महिन्यात सिन्नर बाजार समितीत अवघी एक क्विंटल तुरीची आवक झाली. भुसार मालाची आवक कमी असल्याचे पाहायला मिळत आहे. 

नागपूरमध्ये पाच हजार रुपये क्विंटल 

नागपूर  ः विदर्भातील बाजारपेठांमध्ये तूर सद्या भाव खावून जात आहे. चांगल्या प्रतीच्या तुरीची खरेदी नागपूरसह कारंजा आणि अमरावती बाजार समितीत पाच हजार रुपये क्‍विंटलने होत असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. 

अमरावती बाजार समितीत गुरुवारी (ता.२३) तूरीला ४५०० ते ५०५१ रुपयांचा दर मिळाला. नागपूर बाजार समितीत ४७०० ते ५४०२ रुपये क्‍विंटल दराने तूरीचे व्यवहार झाले. नागपूर बाजारातील आवक सरासरी १००० क्‍विंटलची आहे. 

वाशीम जिल्हयातील कारंजा बाजार समितीत तूरीला उच्चांकी दर मिळाला. गुरुवारी ४७५० ते ५४५५ रुपये क्‍विंटलने येथे तूरीचे व्यवहार झाले. कारंजा बाजार समितीत तूरीची आवक ८०० क्‍विंटलची आहे. सुरवातीला कमी, त्यानंतर संततधार, मॉन्सुनोत्तर आणि अवकाळी अशाप्रकारचा फटका विविध टप्प्यावर तूर पीकाला बसला. त्यामुळे उत्पादकता प्रभावित झाल्याने दरात काहीशी तेजी आल्याचे सांगण्यात आले. 

नगरमध्ये ४३५१ ते ४८५० रुपये दर

नगर  ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत महिनाभरापासून तुरीची आवक सुरू आहे. गुरूवारी (ता. २३) तुरीला ४३५१ ते ४८५० रुपयांचा व सरासरी ४६०० रुपयांचा प्रतिक्विंटल दर मिळाला. 

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून तुरीची बऱ्या प्रमाणात आवक होऊ लागली आहे. जिल्ह्यामध्ये यंदा तुरीचे क्षेत्र जास्त असल्यामुळे उत्पादन हे बऱ्यापैकी होण्याची शक्यता आहे. ती ओळखून ४५०० ते ४८०० रुपये व सरासरी ४४०० रुपयांचा दर मिळाला. ९ जानेवारी रोजी ४९ क्विंटलची आवक होऊन ४००० ते ४८०० रुपये व सरासरी रुपयाचा दर मिळाला. 

दोन जानेवारी रोजी १४ क्विंटल आवक झाली. त्यावेळी ४९०० रुपयांचा प्रतिक्विंटल दर मिळाला. नगर बाजार समितीसह जिल्हाभरातील सर्वच बाजार समितीत तुरीची आवक होत आहे. शासनाच्या हमीभाव दरानुसार मात्र माल चांगला नसल्याचे सांगत खरेदी केली जात नसल्याचे दिसून येत आहे.

अकोल्यात ४१०० ते ५२०० रुपये प्रतिक्विंटल

अकोला : येथील बाजार समितीमध्ये तुरीची आवक दररोज सुधारत चालली आहे. गुरुवारी (ता. २३) विक्रीला आलेल्या तुरीला  ४१०० ते ५२०० रुपयांदरम्यान प्रतिक्विंटल दर मिळाला. 

बाजारात ४७५ क्विंटल तूर विक्रीसाठी आली होती. तुरीचा सध्याचा सरासरी दर पाच हजार रुपये प्रतिक्विंटल असा मिळत आहे. बाजार समितीमध्ये नवीन आणि जुनी, अशा दोन्ही प्रकारची तूर विक्रीसाठी येत आहे. या हंगामात लागवड केलेल्या तुरीची काढणी सध्या जोमाने सुरू झाली आहे. पुढील आठवड्यानंतर तुरीच्या आवकेत आणखी वाढीची शक्यता आहे. 

गुरुवारी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत आलेल्या तुरीला किमान ४१०० रुपये आणि कमाल ५२०० रुपये भाव मिळाला. सरासरी पाच हजारापर्यंतचा दर शेतकऱ्यांना मिळत आहे.

औरंगाबादमध्ये तूर ४३०० ते ४७५० रुपये प्रतिक्‍विंटल

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२२) तुरीची ५१५ क्‍विंटल आवक झाली. तिला ४३०० ते ४७५० रूपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये ९ जानेवारीला ६८४ क्‍विंटल आवक झाली. त्यावेळी तुरीला ४००० ते ४८०१ रूपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १४ जानेवारीला ५७७ क्‍विंटल आवक झाली. तेव्हा तुरीचे दर ४००० ते ४९०० रूपये प्रतिक्‍विंटल राहिले. १५ जानेवारीला तुरीची आवक २१६ क्‍विंटल, तर दर ४५८१ ते ४८९९ रूपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

१८ जानेवारी रोजी ५४१ क्‍विंटल आवक झालेल्या तुरीचे दर ४३०० ते ४७८८ रूपये प्रतिक्‍विंटल राहिले. 

२० जानेवारीला ७१५ क्‍विंटल आवक झाली. त्यावेळी तुरीला ४००० ते ४८२५ रूपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

२१ जानेवारी रोजी ५९७ क्‍विंटल आवक झालेल्या तुरीला ४३०० ते ४७७१ रूपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com