सांगली जिल्ह्यात तूर खरेदी मर्यादा वाढविण्याचा तिढा कायम

खरेदीची मर्यादा वाढविण्यासाठी कृषी मंत्री, पणन मंत्री यांची भेट घेतली आहे. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक होणार असून तूर खरेदी मर्यादा वाढवण्याबाबत चर्चा होऊन मार्ग निघेल असे वाटत आहे. - दिनकर पाटील, सभापती, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगली.
Tour continues to raise tour limit in Sangli district
Tour continues to raise tour limit in Sangli district

सांगली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्रावर विक्रीस आणलेली तूर आजही बाजार समितीच्या आवारात सुरू केलेल्या केंद्रात तशीच ठेवली आहे. तूर विक्रीसाठी दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांना संदेश पाठविण्यात आले असून त्या शेतकऱ्यांनी देखील तूर विक्रीसाठी आणलेली नाही. सोळा दिवस झाले तरी अद्यापही तूर खरेदी मर्यादा वाढविण्याचा तिढा सुटलेला नाही. 

फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तूर खरेदी केंद्र सुरू झाले. परंतु, मर्यादा कमी असल्याने तूर विक्री न करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी घेतल्याने केंद्रात २०० क्विंटल तूर शेतकऱ्यांनी ठेवली आहे. शेतकरी दररोज मर्यादा वाढली की नाही, याबाबत फोनवरून चौकशी करत आहेत. खरेदीची मर्यादा अद्यापही वाढवली नसल्याचे खरेदी केंद्राकडून शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे. 

वास्तविक पाहता शेतकऱ्यांनी केंद्रात ठेवलेल्या २०० क्विंटल तुरीची हमीभावानुसार ११ लाख ६० हजार रुपये इतकी रक्कम होत आहे. मर्यादा वाढली नसल्याने तुरीची विक्री केली नाही. मर्यादा वाढली नाही तर शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. 

दरम्यान, पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांनी तूर विक्री न करण्याचा निश्चय केला असल्याने आता खरेदी केंद्राने दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांना तूर विक्रीस घेऊन या संदेश पाठविण्यात आला आहे. मात्र, या टप्प्यातील शेतकऱ्यांनी देखील तूर विक्रीस पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. तूर खरेदीची मर्यादा वाढली तरच दुसऱ्या टप्प्यातील शेतकरी तूर विक्रीस येतील. यामुळे खरेदीची मर्यादा कधी वाढणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com