Agriculture news in marathi tour in farmers' houses in Sangli district | Agrowon

सांगली जिल्ह्यात द्यापही तूर खरेदी सुरू नाही...

टीम अॅग्रोवन
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

हमीभावाने तूर विक्रीसाठी नोंदणी केली आहे. मात्र, अद्यापही तूर विक्रीबाबत निरोप आला नाही. त्यामुळे तुरीची घरातच साठवणूक केली आहे. नाफेडने लवकरात लवकर तूर खरेदी सुरू करावी.
- सिन्नाप्पा पवार, शेतकरी, उटगी, ता. जत.

सांगली : शासनाने हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी येथील बाजार समितीच्या आवारात खरेदी केंद्र सुरू केले. आजअखेर २५० हून अधिक शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली आहे. अद्यापही तूर खरेदी सुरू झाली नाही. त्यामुळे ती कधी सुरू करणार, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. या भागातील तूर काढून झाली आहे. शेतकऱ्यांनी घरात पोत्यांची रास करून ठेवली आहे.

शेतकऱ्यांच्या शेतीमाला योग्य भाव मिळावा, यासाठी शासनाने शेतीमालाला हमीभाव देण्याचा निर्णय घेतला. यानुसार मका, सोयाबीन, तूर आदी शेतीमालाचे हमीभाव निश्चित केले. तूर ज्या शेतकऱ्यांना विक्री करायची आहे, अशा शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे २५० हून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यानंतर खरेदी करताना प्रत्येक शेतकऱ्यांना तूर विक्रीसाठी यावे, असे सांगण्यात येणार आहे. मात्र, खरेदीबाबत अद्यापही कोणत्याही शेतकऱ्यांना निरोप दिला नाही. त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत.

शासनाने तुरीला पाच हजार ८०० रुपये हमीभाव दिला आहे. खानापूर, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ या भागांत मोठ्या प्रमाणात तुरीचे पीक घेतले जाते. या भागातील तूर काढून झाली आहे. शेतकऱ्यांनी घरात पोत्यांची रास करून ठेवली आहे. तुरीची अधिक काळ साठवण केली, तर त्याला कीड लागण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर तूर विक्री केल्यानंतर कर्ज भरावे लागणार आहे.  त्यामुळे स्थानिक बाजार पेठेत विक्री केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तिथे तुरीला प्रतिक्विंटल साडेचार ते पाच हजार असा दर आहे. त्यामुळे पाचशे ते एक हजार ३०० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. तुरीची कधी खरेदी होते, याचीच प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. 


इतर ताज्या घडामोडी
राज्यात वळीव पावसाचा दणका सुरूच पुणे : राज्यातील पुणे, नगर, जालना, यवतमाळ,...
गरजूंसाठी या बळीराजाने खुली केली...नाशिक : सध्याच्या टाळेबंदीच्या काळात हातावर...
मुख्य सचिव अजोय मेहता यांना मुदतवाढमुंबई  : राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता...
अंकुशनगर परिसरात पावसाचा दणका अंकूशनगर, जि. जालना: एकिकडे कोरोनाचे सावट...
परराज्यातील कामगार, कष्टकऱ्यांची पूर्ण...मुंबई : जीवनावश्यक वस्तूंची, औषधांची कमी नाही,...
विमानसेवा बंदचा भाजीपाला निर्यातीला...पुणे : फेब्रुवारी ते मे या काळात युरोपीय...
देशातील रुग्णसंख्या ९०० च्या घरातनवी दिल्ली : महासत्ता अमेरिकेसह संपूर्ण जगात...
मुंबई बाजार समितीत आज व्यापाऱ्यांचा...मुंबई : राज्य शासनाच्या आदेशामुळे सुरू...
‘कोरोना’चा सामना करण्यासाठी ११ हजार...अकोला  ः कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
वऱ्हाडातील ६५ हजारांवर नागरिक गावी परतलेअकोला ः रोजगार, नोकरीच्या निमित्ताने शहरांमध्ये...
अकोल्यातील दिड हजारांवर शेतकऱ्यांची...अकोला ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
जिल्हा परिषदेचे दीड लाख कर्मचारी देणार...नगर ः कोरोना संसर्गाबाबत उपाययोजना करण्यासाठी...
नगर जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी पावसाचा...नगर  ः नगर जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी...
शेतमाल निर्यातीसाठी वाणिज्य मंत्रालयाने...नागपूर  ः राज्यात जारी करण्यात आलेल्या...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात पाऊस औरंगाबाद/जालना: दोन्ही जिल्ह्यातील जवळपास ६७...
कलिंगड, खरबूज उत्पादक शेतकऱ्यांना फटकासोलापूर ः खास उन्हाळी हंगाम डोळ्यासमोर ठेवून...
राज्य तलाठी संघांकडून एक दिवसाचे वेतन...परभणी ः कोरोना बाधितांच्या मदतीसाठी तलाठी, मंडल...
नांदेड येथे वाहतूक प्रमाणपत्र कक्ष...नांदेड ः अत्यावश्यक सेवा, वस्तू यांचा पुरवठा...
सांगली, मिरज, कुपवाड शहरात घरपोच...सांगली ः महापालिकेतर्फे सांगली, मिरज आणि कुपवाड...
नगर जिल्ह्यात लाख मोलाची फुले होताहेत...नगर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर परराज्यातील...