सांगलीत तूर हमीभाव खरेदी केंद्र सुरू

Tour Guarantee Shopping Center opened in Sangli
Tour Guarantee Shopping Center opened in Sangli

सांगली : नाफेड व स्टेट महाराष्ट्र स्टेट-को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे मार्केट यार्डातील विष्णू अण्णा सहकारी खरेदी-विक्री संघ येथे तूर हमीभाव केंद्र सुरू झाले. सभापती दिनकर पाटील यांच्या हस्ते त्याचा प्रारंभ करण्यात आला. 

विष्णू अण्णा खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष संग्राम पाटील, संचालक मारुती पाटील, मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी दिलीप पाटील, आर. एम. दानोळे, शिवाजी पाटील, बाजार समितीचे प्रभारी सचिव आर. ए. पाटील, सहसचिव जे. के. पाटील, संघाचे व्यवस्थापक सुभाष मस्कर, सूर्यकांत शिंदे आदी उपस्थित होते. 

‘‘या खरेदी केंद्रावर हेक्‍टरी एकच क्विंटल तूर खरेदी केली जाते. त्यामध्ये वाढ करून दहा क्विंटलपर्यंत खरेदी करावी, यासाठी सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल,’’ असे सभापती पाटील यांनी सांगितले. 

पाटील म्हणाले, ‘‘बाजार समितीच्या आवारात हे केंद्र दरवर्षी सुरू केले जाते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. जत तालुक्यातील आठ ते दहा शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आणली होती. प्रतिक्विंटल ५ हजार ८०० रुपये अशा हमीभावाने तिची खरेदी होत आहे.’’

दरम्यान, नाफेडतर्फे एकरी ११० किलोच तूर हमीभावाने खरेदी केली जाते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची तूर शिल्लक राहणार आहे. गेल्यावर्षी प्रमाणे एकरी दहा क्विंटल तूर खरेदी करावी, अशी मागणी बाजार समितीतर्फे बाळासाहेब पाटील यांच्याकडे करण्यात येईल. शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा, असे अवाहन करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com