बीड जिल्ह्यातील तूर, हरभऱ्याची केवळ दोनच खरेदी केंद्रे सुरू

बीड : ‘‘जिल्ह्यात हमी दराने तूर व हरभरा खरेदीसाठी सुरू करण्यात आलेल्या केंद्रांपैकी केवळ दोन केंद्रावरच खरेदी सुरू आहे,’’ अशी माहिती डीएमओ कार्यालयातर्फे देण्यात आली.
 tour, Only two green gram shopping centers opened In the Beed district
tour, Only two green gram shopping centers opened In the Beed district

बीड : ‘‘जिल्ह्यात हमी दराने तूर व हरभरा खरेदीसाठी सुरू करण्यात आलेल्या केंद्रांपैकी केवळ दोन केंद्रावरच खरेदी सुरू आहे,’’ अशी माहिती डीएमओ कार्यालयातर्फे देण्यात आली. 

बीड जिल्ह्यात तूर व हरभरा खरेदीसाठी जवळपास १२ केंद्रे मंजूर करण्यात आली. यामध्ये बीड, गेवराई, परळी, अंबाजोगाई, माजलगाव, कडा, पाटोदा, शिरूर कासार, धारूर, मंगरूळ, शिराळ, फुलसांगवी आदी केंद्रांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील या सर्व केंद्रावरून तूर खरेदी साठी जवळपास १८ हजार ३८३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. तर, १० हजार ७३३ शेतकऱ्यांनी हरभरा खरेदी साठी नोंदणी केली. तुरीसाठी नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये बीड केंद्रावरील २०१७, गेवराई ८५२, परळी १४७४, अंबाजोगाई ९०८, माजलगाव १२०२, आष्टी कडा २४४६, पाटोदा १२९२, शिरूर कासार १२६१, धारूर ३३५६, मंगरूळ १९७३, शिराळ ९२१, तर फुलसांगवी येथील ३८१ शेतकऱ्यांचा समावेश आहे. 

हरभऱ्याच्या खरेदीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांमध्ये गेवराई येथील केंद्रावरून १४, परळी ११९८, अंबाजोगाई ५७९९, माजलगाव ७९, आष्टी कडा १३०, धारूर ३४६४, तर मंगरूळ येथील केंद्रावरील ४९ हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश आहे. या १२ केंद्रांपैकी केवळ आष्टी कडा व मंगरूळ येथील केंद्रावरच तूर व हरभरा खरेदीची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती डीएमओ कार्यालयातर्फे देण्यात आली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com