सांगली जिल्ह्यात तूर क्षेत्रात २ हजार ४२३ हेक्टरने घट

सांगली जिल्ह्यात तूर क्षेत्रात २ हजार ४२३ हेक्टरने घट
सांगली जिल्ह्यात तूर क्षेत्रात २ हजार ४२३ हेक्टरने घट

सांगली ः जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र, गेल्यावर्षी अपेक्षित पाऊस झाला नाही. यंदा उन्हाळी पावसाने दडी मारली. यामुळे दुष्काळी भागातील सहा तालुक्यातील तुरीचे क्षेत्र गेल्यावर्षीपेक्षा २ हजार ४२३ हेक्‍टरने घटले आहे. जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुक्यांत प्रामुख्याने हुकमी पीक म्हणून शेतकरी तूर लागवडीकडे वळले. कमी पाण्यात अधिक उत्पादन मिळते. त्याबरोबर शासनाने तुरीला हमीभाव दिला आहे. त्यामुळे गेल्या तीन ते चार वर्षापासून जिल्ह्यात तुरीचे क्षेत्र वाढले होते. परंतु, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दुष्काळी पट्ट्यात पावसाने सरासरीदेखील गाठली नाही. हळूहळू तुरीचे क्षेत्र कमी होऊ लागले आहे. गेल्यावर्षी उपलब्ध पाण्यावर जिल्ह्यात ७ हजार ५२० हेक्‍टरवर तुरीचा पेरा झाला. जत तालुक्‍यात सर्वाधिक तुरीची पेरणी झाली होती.  यंदा दुष्काळी पट्ट्यात शेतकऱ्यांनी तूर पिकासाठी शेताची मशागत करुन ठेवली. यंदा या भागात उन्हाळी पावसाने दडी मारली. त्यातही मॉन्सून लांबवणीवर गेला. त्यामुळे शेतकऱ्यांनी तूर पेरणीसाठी केलेली शेती पेरणीविना तशीच राहिली. त्यामुळे जत तालुक्‍यातील तुरीचे क्षेत्र २६६० हेक्‍टरने कमी झाले.  गेल्यावर्षी आटपाडी, तासगाव या तालुक्‍यात तुरीचे क्षेत्र कमी होते. परंतु, यंदा या भागात टेंभू आणि ताकारीचे पाणी आल्याने तुरीच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे चित्र आहे. वाळवा आणि कडेगाव तालुका ऊस, द्राक्ष, हळद ही पिके घेणारा तालुका आहे. परंतु, या तालुक्‍यात देखील गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ३०२ हेक्‍टरने, तर कडेगाव तालुक्‍यात १८२ हेक्‍टरने क्षेत्र वाढले आहे. तालुकानिहाय खरीप हंगाम २०१९ मधील तुरीचे क्षेत्र (हेक्‍टरमध्ये) ः मिरज ४२, जत २३७२, खानापूर ८९७, वाळवा ४४९, तासगाव ९६७, आटपाडी २२.२५, कवठेमहांकाळ ५६, कडेगाव २९२, एकूण ५०९७. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com