अजिंठा लेणीत पर्यटकांना आजपासून प्रवेश

औरंगाबाद : कोरोना आजाराचा प्रसार होऊ नये, यासाठी मागील नऊ महिन्यांपासून बंद असलेली जगप्रसिद्ध अजिंठा लेणी बुधवार (ता.९) पासून सुरू करण्यात आली. मात्र, लेणीत आज (ता.१०) पासून ऑनलाइन नोंदणी केल्यानंतरच प्रवेश मिळेल.
 Tourists can enter Ajanta Caves from today
Tourists can enter Ajanta Caves from today

औरंगाबाद : ‘‘कोरोना आजाराचा प्रसार होऊ नये, यासाठी मागील नऊ महिन्यांपासून बंद असलेली जगप्रसिद्ध अजिंठा लेणी बुधवार (ता.९) पासून सुरू करण्यात आली. मात्र, लेणीत आज (ता.१०) पासून ऑनलाइन नोंदणी केल्यानंतरच प्रवेश मिळेल. तरी, सर्वांनी कोरोनासंबंधी सर्व सूचनांचे पालन करावे’’, असे आवाहन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

अजिंठा येथे अजिंठा पर्यटन केंद्र परिसरात लेणीमध्ये प्रवेश कार्यक्रम सत्तार यांच्या हस्ते झाला. अजिंठ्याचे उपसरपंच शेख मुन्शी, सभापती रस्तूल बी उस्मान खान, रघुनाथ चव्हाण, देविदास लोखंडे, प्रभाकर काळे, तहसीलदार प्रवीण पांडे, गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे क्षीरसागर, भारतीय पुरातत्त्व विभागाचे शेख कलिमोद्दीन, अजिंठा गाइड असोसिएशनचे सय्यद अब्रार, अजिंठा हस्तकला व परिसर विकास असोसिएशनचे पदाधिकारी आदींची उपस्थिती होती. 

सत्तार म्हणाले, ‘‘मागील नऊ महिन्यांपासून जगप्रसिद्ध अजिंठा लेणी बंद होती. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शासनाने व्यापारी, छोटे व्यावसायिक, गाइड, पर्यटक आदींचा विचार करत अटी व शर्तींसह प्रवेश देण्यास सुरवात केली आहे. याठिकाणी आवश्यक सर्व पायाभूत सुविधा शासनामार्फत देण्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल. मात्र, सर्वांनी कोरोनासंबंधी सूचनांचे पालन करावे. अजिंठा लेणी परिसरातील व्यावसायिकांच्या अडचणीही लवकरच दूर करण्यात येतील. प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी करावी.’’ 

अजिंठा हस्तकला व परिसर विकास असोसिएशन, अजिंठा गाइड असोसिएशन आणि प्रशासनातर्फे सत्तार यांचे स्वागत करण्यात आले. आबा काळे, गोपी जाधव, दुर्गा पवार, विठ्ठल आगळे, रमेश कापसे, अब्दुल अजीज, मेहबूब पठाण, इम्रान शाह, राधेश्याम जाधव आदी उपस्थित होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com