औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत केंद्रांवरील तूर खरेदी आदेशाविना रखडली

tours buying of centers were held without orders in Aurangabad, Jalna districts
tours buying of centers were held without orders in Aurangabad, Jalna districts

औरंगाबाद : बाजारात हमी दरापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी सुरू आहे. तरीही खरेदी केंद्रावरून तूर खरेदी सुरू होण्यास अजून आदेशाची प्रतीक्षा आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ७ तर, जालना जिल्ह्यात पाच केंद्रे अशा एकूण १२ केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी जालन्यातील चार, तर औरंगाबादमधील पाच केंद्रांवर शेतकऱ्यांनी हमी दराने तूर खरेदीसाठी नोंदणी केली आहे.

खरेदी केंद्रांद्वारे खरेदीस कायम विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल गरजेनुसार मिळेल त्या भावात विकण्याशिवाय पर्याय उरत नाही. अशीच काहीशी स्थिती आता तुरीच्या बाबतीत होताना दिसते आहे. तुरीची काढणी, मळणी व विक्री जिल्ह्यात सध्या जोरात सुरू आहे. १ जानेवारीपासून सुरू झालेल्या हमी दराने तूर खरेदीसाठी १५ फेब्रुवारीपर्यंतची मुदत आहे. त्यामुळे त्यापूर्वी खरेदी केंद्र सुरू होतील की नाही, हा प्रश्‍न आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात विदर्भ मार्केटिंग फेडरेशनद्वारे लासूर व पैठण येथे मंजूर केलेल्या दोन हमी दराने तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. लासूर येथील केंद्रावर आजपर्यंत १२४, तर पैठण येथील केंद्रावर तब्बल ५२४ शेतकऱ्यांनी हमी दराने तूर खरेदीसाठी नोंदणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. १५ फेब्रुवारीपर्यंत ही नोंदणी सुरू राहणार असल्याने हा आकडा आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. 

जालना जिल्ह्यात ५३२ शेतकऱ्यांचा प्रतिसाद 

जालना जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनच्या प्रस्तावित सहा पैकी अंबड, जालना, तिर्थपूरी, मंठा व भोकरदन या पाच केंद्रांना मंजुरी मिळाली. तर, परतूरच्या केंद्राची मंजुरी अजून बाकी आहे. यापैकी अंबड व तिर्थपूरी येथील केंद्रावर प्रत्येकी ८३, तर जालनामध्ये ३३० व मंठा येथील केंद्रावर ३६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. भोकरदन केंद्रावर अजून नोंदणी नाही. खरेदी सुरू करण्याचे आदेश येणे अजून बाकी आहे.

औरंगाबादमध्ये पाच केंद्रांवर नोंदणी

औरंगाबाद जिल्ह्यात सात केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. त्यामध्ये गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, कन्नड व औरंगाबाद या केंद्रांचा मार्केटिंग फेडरेशनतंर्गत, तर पैठण व लासूर येथील केंद्रांचा विदर्भ मार्केटिंग फेडरेशनतंर्गत समावेश आहे. या व्यतिरिक्‍त करमाड येथील केंद्र मार्केटिंग फेडरेशनद्वारे प्रस्तावित आहे. त्यालाही जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. या सर्व केंद्रांपैकी गंगापूर, खुलताबाद व औरंगाबाद या केंद्रांवर हमी दराने तूर खरेदीसाठी प्रतिसाद मिळणे सुरू झाले आहे. गंगापूरच्या केंद्रावर १०६, खुलताबाद येथे १, तर औरंगाबाद येथील ४ ते ५ शेतकऱ्यांनी हमी दराने तूर खरेदीसाठी नोंदणी केली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com