नांदेड जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदी सुरू

नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत नांदेड जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाअंतर्गंत तीन खरेदी केंद्रांवर तूर खरेदी करण्यात आलेल्यापैंकी ५९७ शेतकऱ्यांना तुरीचे १ कोटी ५० लाख ६९ हजार ८५० रुपये एवढ्या रकमेचे चुकारे अदा केले आहेत. तूर खरेदी पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. ‘कोरोना’ विषाणूच्या संसर्गच्या पार्श्वभूमीवर केंद्रावर गर्दी कमी करण्यासाठी दक्षता घेतली जात आहे, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली.
Tours of Nanded district are guaranteed scheme started purchasing

‘कोरोना’ विषाणू संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोजना अंतर्गंत गर्दी टाळण्यासाठी हमीभाव खरेदी केंद्र काही दिवस बंद करण्यात आले होते. परंतु योग्य ती दक्षता घेण्याचे निर्देश देत जिल्हा प्रशासनाने तूर खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले. बुधवार (ता. १) पासून परत तूर खरेदी सुरू करण्यात आली तेंव्हापासून मुखेड येथे ५८ क्विंटल, किनवट येथे २८ क्विंटल आणि देगलूर येथील केंद्रावर २५ क्विंटल तूर खरेदी सुरू करण्यात आली आहे. अन्य केंद्र लवकरच सुरू होणार आहेत. 

जिल्हा पणन अधिकारी कार्यलयाअंतर्गंत जिल्ह्यातील नांदेड, हदगाव, किनवट, बिलोली, देगलूर, मुखेड या सहा खरेदी केंद्रांवर १७ मार्चपर्यंत २ हजार २३४ शेतकऱ्यांची ९ हजार ९१९ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे.

हमीभावाने (प्रतिक्विंटल) या तुरीची किंमत ५ कोटी ७५ लाख ३५ हजार ७१० रुपये एवढी होते. शुक्रवार (ता. ३) पर्यंत जिल्ह्यातील ५९७ शेतकऱ्यांच्या खात्यावर तुरीच्या चुकाऱ्याची १ कोटी ५० लाख ६९ हजार ८५० रुपये एवढी रक्कम जमा करण्यात आली. त्यात नांदेड (अर्धापूर) केंद्रावरील ९० शेतकऱ्यांना ३५ लाख ९१ हजार ७६६ रुपये, हदगाव केंद्रांवरील ३०२ शेतकऱ्यांना ५७ लाख ३९ हजार १०० रुपये, मुखेड येथील केंद्रावरील २०५ शेतकऱ्यांना ५७ लाख ३८ हजार ९८४ रुपये एवढ्या रकमांचा समावेश आहे, असे पाटील यांनी सांगितले.

पाळला जातोय सोशल डिस्टन्स  ‘कोरोना’ विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजनांची प्रभावीपणे अमंलबजावणी केली जात आहे. गर्दी कमी करण्यासाठी दररोज ५ ते १० शेतकऱ्यांना एसएमएसव्दारे केंद्रांवर तूर घेऊन येण्याची सूचना दिली जात आहे. चाळणी तसेच मोजमाप करतेवेळी हमाल-कामगार, शेतकरी यांच्यात योग्य अंतर रहावे, यासाठी दक्षता घेतली जात आहे. हात धुण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com