दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी लागणारे माध्यम आणि वातावरण तसेच काडाचे निर्ज
ग्रामविकास
स्मार्ट गावाच्या दिशेने...
स्वच्छतेचा ध्यास मनाशी बाळगून सावळवाडी गावाने समृध्दीच्या दिशेने पाऊले टाकली आहेत. ग्रामविकासासाठी गावकरी एकत्र आले. एकीच्या बळावर गावाने ‘स्मार्ट व्हिलेज' मध्ये आपले स्थान बळकट केले आहे. गावच्या सरपंचपदी माझी ४ डिसेंबर,२०१७ मध्ये निवड झाली.
ग्रामपंचायत सदस्य सुदाम कोळी, विजय मसुटगे, नितीन दणाणे, ग्रामविकास अधिकारी अविनाश धनवडे, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि गावकऱ्यांनी स्वच्छता अभियानात चांगली साथ दिली आहे.
लोकसहभागातून स्मार्ट ग्राम
स्वच्छतेचा ध्यास मनाशी बाळगून सावळवाडी गावाने समृध्दीच्या दिशेने पाऊले टाकली आहेत. ग्रामविकासासाठी गावकरी एकत्र आले. एकीच्या बळावर गावाने ‘स्मार्ट व्हिलेज' मध्ये आपले स्थान बळकट केले आहे. गावच्या सरपंचपदी माझी ४ डिसेंबर,२०१७ मध्ये निवड झाली.
ग्रामपंचायत सदस्य सुदाम कोळी, विजय मसुटगे, नितीन दणाणे, ग्रामविकास अधिकारी अविनाश धनवडे, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि गावकऱ्यांनी स्वच्छता अभियानात चांगली साथ दिली आहे.
लोकसहभागातून स्मार्ट ग्राम
- वारणा नदीकाठी असलेले सावळवाडी हे बागायती गाव. गावातील शेती क्षेत्र २३० हेक्टर. लोकसंख्या सुमारे १ हजार ८१८. भाजीपाला, ऊस ही महत्त्वाची पिके. त्याचबरोबरीने पशूपालनदेखील चांगल्या प्रकारे रूजले आहे.
- गावशिवारातील पर्यावरण चांगले राहिले तरच गाव चांगले राहते. ग्रामस्थांचे आरोग्य नीट राहते. हे लक्षात घेऊन ग्रामस्थ एकत्र आले. गावकऱ्यांनी पहिल्यांना रस्त्यांपासून स्वच्छता मोहीम राबवली. सर्वांना स्वच्छतेचे महत्त्व पटू लागले.
- ग्रामस्थांनी गाव स्मार्ट करण्याचे ध्येय बाळगले. त्यानुसार नियोजन झाले. स्वच्छता अभियानात तालुका स्तरावर दुसरा क्रमांक, जिल्हा स्तरावर तिसरा आणि विभागात चौथा क्रमांक गावाने मिळवला आहे. गाव स्मार्ट करताना ग्रामस्थांच्या बरोबरीने प्रशासनाचीदेखील मदत महत्त्वाची ठरली. गावकऱ्यांनी एकत्र येऊन दारूबंदी, प्लॅस्टिकबंदी मोहीम राबविली. याला चांगले यश मिळाले. यामुळे गावकऱ्यांनी विविध उपक्रम हाती घेतले आहेत.
- पर्यावण संतुलन राखण्यासाठी गावात वृक्ष लागवड केली आहे. येत्या दोन वर्षात गावात सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. हे ग्राम सुरक्षेसाठी महत्वाचे ठरणार आहे. गावाची पिण्याच्या पाण्याची योजना सौरऊर्जेवर करण्याचे नियोजन केले आहे. त्याचबरोबरीने स्वच्छ पाणी उपलब्धतेसाठी गावात ग्रामपंचायतीतर्फे वॉटर एटीएम बसविण्याचे नियोजन आहे. यासाठी जिल्हा प्रशासन आणि विविध कंपन्यांच्या बरोबर चर्चा सुरू आहे.
शेतकरी गटातून प्रगती
- अलीकडच्या काळात सेंद्रिय शेतीचा कल वाढला आहे. गावातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीची माहिती मिळावी, यासाठी सेंद्रिय शेती शिबिर, चर्चासत्रे आयोजित केली जातात. यामुळे सेंद्रिय शेती आणि बाजारपेठेबाबत माहिती मिळू लागली. गावामध्ये गटशेती, सेंद्रिय शेतीचे विविध उपक्रम राबविले जातात. त्याचा शेती विकासासाठी फायदा झाला आहे.
- गावातील महिलांचे २५ स्वसंसहाय्यता बचत गट स्थापन केले आहेत. या माध्यमातून शेतमाल प्रक्रिया उद्योग तसेच पशूपालनाला चालना देण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने आम्ही पाऊले उचलली आहेत.
संपर्कः राजेंद्र उपाध्ये, ९११२०३४१०८
(सरपंच, सावळवाडी, ता. मिरज, जि. सांगली)
- 1 of 16
- ››