खरिपासाठी नगरमध्ये साडेसहा लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावीत 

गर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६ लाख ६७ हजार ६६० हेक्टर क्षेत्र प्रस्तावीत केले आहे. मागील तीन वर्षांतील पेरणी झालेल्या क्षेत्राच्या अनुषंगाने यंदा हे क्षेत्र प्रस्तावीत केले आहे.
खरिपासाठी नगरमध्ये  साडेसहा लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावीत In town for kharif Six and a half lakh hectare area proposed
खरिपासाठी नगरमध्ये  साडेसहा लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावीत In town for kharif Six and a half lakh hectare area proposed

पुणे नगर : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६ लाख ६७ हजार ६६० हेक्टर क्षेत्र प्रस्तावीत केले आहे. मागील तीन वर्षांतील पेरणी झालेल्या क्षेत्राच्या अनुषंगाने यंदा हे क्षेत्र प्रस्तावीत केले आहे. अर्थात पावसावर क्षेत्र अवलंबून राहणार आहे. त्यानुसार प्रस्तावीत क्षेत्रात बदल होऊ शकतो, असे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातून सांगण्यात आले. 

नगर जिल्ह्यात खरिपाचे ४ लाख ४७ हजार ९०४ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. मात्र गेल्या तीन वर्षांत सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. गेल्यावर्षी सुरवातीलाच झालेल्या चांगल्या पावसामुळे ६ लाख ६३ हजार ९९० हेक्टर क्षेत्रावर खरिपात पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या तीन वर्षांतील पेरणीची स्थिती पाहून यंदा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने खते, बियाणे मागणीच्या अनुषंगाने ६ लाख ६७ हजार ६६० हेक्टर क्षेत्र अंदाजित पेरणी होणार असल्याचे गृहीत धरून प्रस्तावीत केले आहे. 

पावसाळ्याच्या सुरुवातीला अधिक पाऊस झाला तर खरिपाच्या पेरणी क्षेत्रात वाढ होत असल्याचा आतापर्यंतचा अनुभव आहे. मात्र पावसाने सुरुवातीच्या काळात खंड दिला तर मात्र क्षेत्रात घट होते. पीक पद्धतीही बदल होतो. त्यामुळे यंदा ६ लाख ६७ हजार ६६० हेक्टर क्षेत्र अंदाजित पेरणी होणार असल्याचे गृहीत धरून प्रस्तावीत केले असले तरी पावसाच्या स्थितीवर पेरणी अवबंलून असेल असे माहिती अधिकारी राजेश जानकर यांनी सांगितले.  पीकनिहाय असे असेल अंदाजित क्षेत्र (हेक्टर) 

  • भात ः १९,००० 
  • ज्वारी ः १६० 
  • बाजरी ः १,५६,००० 
  • मका ः ७२,००० 
  • तूर ः ५७,००० 
  • मूग ः ६६,००० 
  • उडीद ः ५०,००० 
  • भूईमुग ः १०,००० 
  • तीळ ः ७० 
  • सूर्यफूल ः ४३० 
  • सोयाबीन ः १,०३,००० 
  • कापूस ः १,३४,०००   
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com