Agriculture news in marathi In town for kharif Six and a half lakh hectare area proposed | Agrowon

खरिपासाठी नगरमध्ये साडेसहा लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावीत 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 एप्रिल 2021

गर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६ लाख ६७ हजार ६६० हेक्टर क्षेत्र प्रस्तावीत केले आहे. मागील तीन वर्षांतील पेरणी झालेल्या क्षेत्राच्या अनुषंगाने यंदा हे क्षेत्र प्रस्तावीत केले आहे.

पुणे नगर : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६ लाख ६७ हजार ६६० हेक्टर क्षेत्र प्रस्तावीत केले आहे. मागील तीन वर्षांतील पेरणी झालेल्या क्षेत्राच्या अनुषंगाने यंदा हे क्षेत्र प्रस्तावीत केले आहे. अर्थात पावसावर क्षेत्र अवलंबून राहणार आहे. त्यानुसार प्रस्तावीत क्षेत्रात बदल होऊ शकतो, असे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातून सांगण्यात आले. 

नगर जिल्ह्यात खरिपाचे ४ लाख ४७ हजार ९०४ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. मात्र गेल्या तीन वर्षांत सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. गेल्यावर्षी सुरवातीलाच झालेल्या चांगल्या पावसामुळे ६ लाख ६३ हजार ९९० हेक्टर क्षेत्रावर खरिपात पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या तीन वर्षांतील पेरणीची स्थिती पाहून यंदा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने खते, बियाणे मागणीच्या अनुषंगाने ६ लाख ६७ हजार ६६० हेक्टर क्षेत्र अंदाजित पेरणी होणार असल्याचे गृहीत धरून प्रस्तावीत केले आहे. 

पावसाळ्याच्या सुरुवातीला अधिक पाऊस झाला तर खरिपाच्या पेरणी क्षेत्रात वाढ होत असल्याचा आतापर्यंतचा अनुभव आहे. मात्र पावसाने सुरुवातीच्या काळात खंड दिला तर मात्र क्षेत्रात घट होते. पीक पद्धतीही बदल होतो. त्यामुळे यंदा ६ लाख ६७ हजार ६६० हेक्टर क्षेत्र अंदाजित पेरणी होणार असल्याचे गृहीत धरून प्रस्तावीत केले असले तरी पावसाच्या स्थितीवर पेरणी अवबंलून असेल असे माहिती अधिकारी राजेश जानकर यांनी सांगितले. 

पीकनिहाय असे असेल अंदाजित क्षेत्र (हेक्टर) 

  • भात ः १९,००० 
  • ज्वारी ः १६० 
  • बाजरी ः १,५६,००० 
  • मका ः ७२,००० 
  • तूर ः ५७,००० 
  • मूग ः ६६,००० 
  • उडीद ः ५०,००० 
  • भूईमुग ः १०,००० 
  • तीळ ः ७० 
  • सूर्यफूल ः ४३० 
  • सोयाबीन ः १,०३,००० 
  • कापूस ः १,३४,००० 
     

इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन पेंडची आयात शुल्काविना करावीनागपूर : भारतात सोयाबीन पेंडचे दर गगनाला...
दूधदरात पुन्हा दोन रुपयांची कपातनगर ः कोरोना संसर्ग वरचेवर वाढत असल्याने लॉकडाउन...
देशातील पहिले कृषी निर्यात मार्गदर्शन...पुणे ः राज्यातील शेतकरी व उदयोन्मुख...
उत्तर भारतातील कापूस लागवड पूर्णत्वाकडेजळगाव ः देशात उत्तर भारतातील कापूस लागवडीने वेग...
कृषी खात्यातील बदल्या लांबणीवरपुणे ः ऐन कोरोना कालावधीत बदल्यांचा घाट रचलेल्या...
खाद्यतेल दरात गतवर्षीपेक्षा ८० टक्के वाढनागपूर : शेंगदाण्याची निर्यात तसेच पाम तेलावरील...
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...