पीक मळणीसाठी हार्वेस्टर, ट्रॅक्टरला डिझेल द्या ः तुपकर

बुलडाणा ः सध्या गहू, हरभरा काढणीचा हंगाम सुरू झाला असून शासनाने संचारबंदीच्या काळात ट्रॅक्टर व हार्वेस्टरला डिझेल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. याबाबत संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुलडाण्याच्या जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांची भेट घेऊन गुरुवारी (ता. २६) चर्चा करीत मागणीचे निवेदन दिले.
tractor, harvester for available petrol, diesel about crop threshing
tractor, harvester for available petrol, diesel about crop threshing

बुलडाणा ः सध्या गहू, हरभरा काढणीचा हंगाम सुरू झाला असून शासनाने संचारबंदीच्या काळात ट्रॅक्टर व हार्वेस्टरला डिझेल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. याबाबत संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुलडाण्याच्या जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांची भेट घेऊन गुरुवारी (ता. २६) चर्चा करीत मागणीचे निवेदन दिले.

याबाबच्या निवेदनात संघटनेच्या मागण्या अशा की, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सध्या १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी लाग झालेली आहे. देश कोरोनाच्या संकटाशी ताकतीने लढतोच आहे. यामध्ये शेतकऱ्यांचाही लागू झालेल्या संचारबंदीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. परंतु शेतकरी फक्त ‘कोरोना’च्या संकटाशीच नव्हे तर अस्मानी व सुलतानी संकटांशीही लढत आहे. बुधवारी (ता. २५) झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतातील गहू, हरभरा, मका, ज्वारी व अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत जे थोडेबहुत पीक शेतामध्ये उभे आहे ते पीक घरामध्ये घेऊन जाणे आवश्यक आहे. जर शिवारातील पीक शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहचले नाही तर पुढील वर्षात शेतकऱ्यांनी आपला संसार चालवायचा कसा हाही मोठा प्रश्न आहे. पीक कापणी व मळणीसाठी मजुरांना बोलावणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संयुक्तिक नाही. अशा स्थितीत ट्रॅक्टर व हार्वेस्टरच्या मदतीने २ ते ३ माणसांमध्ये पीक काढणी व मळणीचे काम होऊ शकते. परंतु डिझेल व पेट्रोल उपलब्ध नसल्याने ट्रॅक्टर व हार्वेस्टरचा उपयोग शेतकऱ्यांना करता येणे बंद झालेले आहे. अशा परिस्थितीत शिवारातील पीक शेतकऱ्यांच्या घरात पोचवण्यासाठी ट्रॅक्टर व हार्वेस्टरसाठी डिझेल उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देण्यात याव्यात. तसेच दूध हे जीवनावश्यक वस्तूंमध्ये येते. जी वाहने खेडोपाडी दूध संकलन करुन तालुक्याच्या ठिकाणी पोहचवितात त्या वाहनांनाही डिझेल उपलब्ध करून देण्यात यावे. 

पीक नुकसानाचे तातडीने पंचनामे व्हावे जिल्ह्यात व राज्यातही  बऱ्याच भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने गहू, हरभरा, मका, ज्वारी व अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची गरज आहे. यासाठी योग्य समन्वय साधत तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणीही श्री. तुपकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com