ट्रॅक्टर व्यवसायाला सुगीचे दिवस

कोरोनाच्या काळात अनेक उद्योगधंदे बंद राहिले. व्यवहार ठप्प पडले. उद्योगक्षेत्रात मंदीचे वातावरण अनुभवले. मात्र, याच काळात केवळ शेती फुलत होती. शेतकरी राबत होता.
tractor
tractor

अकोला ः कोरोनाच्या काळात अनेक उद्योगधंदे बंद राहिले. व्यवहार ठप्प पडले. उद्योगक्षेत्रात मंदीचे वातावरण अनुभवले. मात्र, याच काळात केवळ शेती फुलत होती. शेतकरी राबत होता. शेतीशी निगडित असलेल्या ट्रॅक्टर व्यवसायाने मागील तीन-चार वर्षातील मरगळ याच काळात दूर केली. सध्या ट्रॅक्टर खरेदीसाठी वेटींगवर असल्याचे विक्रेते सांगत आहेत. मागील तीन वर्षे ट्रॅक्टर विक्री व्यवसायासाठी फारशी चांगली राहिली नव्हती. मंदीची झळ या उद्योगाने झेलली. कोरोनामुळे यंदाचे वर्ष कसे जाईल याची चिंता ट्रॅक्टर विक्रेत्यांना लागली होती. परंतु हे वर्ष त्यांच्या उद्योगासाठी फावले आहे. कोरोनाच्या काळात ट्रॅक्टर उद्योगाने विक्रीच्या क्षेत्रात तेजी अनुभवली. शेजारच्या बुलडाणा जिल्ह्यात १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या आर्थिक वर्षात जवळपास ११६९ ट्रॅक्टरची विक्री झाली होती. यंदा १ एप्रिलपासून ३० सप्टेंबरपर्यंतच ११४७ ट्रॅक्टर विकून झाले. म्हणजेच वर्षभराचा विक्री अवघ्या सहा महिन्यात झाली. आता तर दसरा-दिवाळीचे पर्व सुरु होत आहे. शिवाय रब्बी हंगामही येत आहे. या काळात ट्रॅक्टर खरेदीला शेतकऱ्यांकडून पसंती दिली जाते. अकोल्यात गेल्या एका महिन्यात एका कंपनीचे ५० ट्रॅक्टर विक्री झाले. आता या महिन्यातही ५० ट्रॅक्टर विक्रीची तयारी झाली. विक्रेत्यांकडे वेटींग आहे.  कोरोनामुळे अनेकांना रोजगार गमवावा लागला. शहरातून नोकरी सोडून गावी आलेले काही जण शेतीत उतरले आहेत. हे शिकलेले तरुण आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी पुढे येत आहेत.

पुरवठा कमी कोरोनाच्या काळात ट्रॅक्टर निर्मीती उद्योगाला झळ पोचली. ट्रॅक्टरला लागणाऱ्या पार्टचा पुरवठा वेळेवर झाला नाही. कंपन्यांमध्ये उत्पादनही ठप्प होते. याचा परिणाम आता ट्रॅक्टर पुरविण्यावर होत आहे. ग्राहकांची मागणी असताना काही कंपन्यांचे ट्रॅक्टर वेळेत मिळत नसल्याची स्थिती बाजारपेठेत आहे. हे या उद्योगासाठी चांगले लक्षण म्हणजेच ग्राहकांची पसंती किती वाढली हे दर्शविणारे ठरत आहे.

प्रतिक्रिया शेतीतील कामांसह शेतमाल वाहतुकीसाठी ट्रॅक्टरचा वापर वाढला. नव्याने शेतीत उतरलेला तरुण वर्ग विविध कामांसाठी ट्रॅक्टरला पसंती देत आहे.  साहजिकच शेतकऱ्यांचा कल ट्रॅक्टर खरेदीकडे आहे. आम्ही गेल्या एका महिन्यात ५० ट्रॅक्टरची विक्री केली. मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदा ट्रॅक्टर व्यवसाय चांगला झाला. आता खरीप हंगाम सुरु असून आगामी सणासुदीत ग्राहकांकडून आणखी मागणीची शक्यता नाकारता येत नाही. - स्नेहल ढवले, ट्रॅक्टर विक्रेत्या, अकोला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com