बिलाची थकीत रक्कम न भरल्यास आता थेट वीजतोडणीची (कनेक्शन कट) कारवाई करण्याचा इशारा महावितरणने राज्
अॅग्रो विशेष
नांदेडमध्ये ३४ लाखांचा शेतीमाल घेऊन व्यापारी फरार
शेतीमालाला बाजारात जास्तीचा भाव देतो असे आमिष दाखवून वाजेगाव (ता. नांदेड) भागातील शिवम ट्रेडर्सचे काचावार या व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना ३४ लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.
नांदेड : शेतीमालाला बाजारात जास्तीचा भाव देतो असे आमिष दाखवून वाजेगाव (ता. नांदेड) भागातील शिवम ट्रेडर्सचे काचावार या व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना ३४ लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड शहराजवळील वाजेगाव भागात काचावार या व्यापाऱ्याचे शिवम ट्रेडर्स नावाने दुकान आहे. यात बी- बियाणे, खते, औषधे खरेदी विक्री तसेच सिमेंट विक्रीचा व्यवसाय आहे. दत्तात्रय महादेव काचावार व त्यांचे बंधू दिगंबर माधव काचावार, अक्षय दत्तात्रेय काचावार, अंकुश दत्तात्रय काचावार कामकाज पाहतात. अनेक वर्षांपासून काचावार यांचे दुकान असल्याने त्यांची वाजेगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांची ओळख होती. त्यांनी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.
वांगी येथील शेतकरी सुरेश सुदाम जाधव यांनी सोयाबीन, हरभरा, तूर, ज्वारी आदी वीस लाख ६१ हजार रुपयांचा शेतीमाल दिला होता. यानंतर ते शिवम ट्रेडर्स या दुकानाकडे गेले असता दुकानाला कुलूप लावून काचावार गायब झाल्याचे समजले. जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नांदेड ग्रामीण पोलिस स्थानकात दत्तात्रय काचावार, दिगंबर काचावार, अंकुश काचावार, अक्षय काचावार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनेक शेतकऱ्यांना घातला गंडा
काचावार यांनी वांगी येथील शेतकरी संतोष विठ्ठल जाधव यांच्या सोयाबीनचे एक लाख रुपये, अर्धापूर तालुक्यातील शहापूर येथील विक्रम तुकाराम पिंपळगाव यांचे एक लाख ४० हजार, तुप्पा येथील पंडित महादेव कदम यांचे दोन लाख २९ हजार, शहापूर येथील राधाजी कामाजी भेगडे यांचे तीन लाख ५५ हजार रुपये हळद, नांदेड तालुक्यातील नागापूर येथील ज्ञानेश्वर आनंदराव मस्के यांचे दोन लाख २५ हजार रुपये किमतीचे सोयाबीन, गजानन लालबा मस्के यांचे तीन लाख रुपये किमतीचे सोयाबीन, मुदखेड तालुक्यातील शिखाचीवाडी येथील बाबाराव पाटील खानसोळे तसेच तक्रारकर्त्यांचे वीस लाख रुपये एकूण ३४ लाख रुपये किमतीचा माल घेऊन व्यापाऱ्याने पोबारा केला आहे.
- 1 of 655
- ››