नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (पोकरा) संरक्षित शेतीत वापरल्या जात असलेल्या अनेक घटकांना
ताज्या घडामोडी
‘गंगाखेड’ला परवाना देण्यासाठी व्यापाऱ्यांकडून मोर्चा, बंद
गंगाखेड शुगर कारखान्यास यंदाच्या हंगामात ऊस गाळप परवाना देण्यात यावा, या मागणीसाठी बुधवारी (ता. २) व्यापारी महासंघातर्फे गंगाखेड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
परभणी : गंगाखेड शुगर कारखान्यास यंदाच्या हंगामात ऊस गाळप परवाना देण्यात यावा, या मागणीसाठी बुधवारी (ता. २) व्यापारी महासंघातर्फे गंगाखेड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. गंगाखेडसह तालुक्यातील बाजापेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला.
माखणी (ता. गंगाखेड) येथील गंगाखेड शुगर कारखान्यास यंदा ऊस गाळप करण्यास साखर आयुक्तांनी परवाना दिलेला नाही .त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आमदार तथा या कारखान्याचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जात आहे. गंगाखेड शुगर कारखान्याच्या गाळप हंगामावर गंगाखेड, तसेच तालुक्यातील अनेक गावांतील बाजारपेठेतील उलाढाल अवलंबून आहे.
यंदा हा कारखाना बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकरी, शेतमजूर, ठेकेदार, ऊसतोड कामगार यांच्या माध्यमातून गंगाखेड बाजारपेठेत दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. परंतु या यंदा कारखान्याचा परवाना रद्द करण्यात आल्यामुळे व्यापाऱ्याचे नुकसान होत आहे. त्यामुळे या कारखान्यास ऊस गाळप परवाना देण्यात यावा या मागणीसाठी बुधवारी (ता. २) व्यापारी महासंघातर्फे बाजारपेठ बंद ठेवण्यात आली.
- 1 of 1023
- ››