मालेगाव बाजार समितीत व्यापाऱ्यांचे उपोषण

मालेगाव बाजार समितीत व्यापाऱ्यांचे उपोषण
मालेगाव बाजार समितीत व्यापाऱ्यांचे उपोषण

नाशिक : मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोकळ्या भूखंडावर एक हजार मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम उभारले जाणार आहे. या विकासकामाला व्यापारी असोसिएशनने विरोध दर्शविला आहे. या मागणीसाठी गुरुवार (ता. २) पासून व्यापाऱ्यांनी बंद पुकारून धरणे आंदोलन सुरू केले आहे. शुक्रवार (ता. ३) सलग दुसऱ्या दिवशी बाजार पेठेतील उलाढाल ठप्प होती. त्यामुळे शेतकऱ्यांना या अडचणीचा सामना करावा लागत आहे. 

व्यापाऱ्यांनी शेतमालाचे लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या मागणीसाठी व्यापारी असोसिएशनचचे अध्यक्ष भिका कोतकर व अडत असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सोनवणे यांच्या नेतृत्वात बाजार समिती प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. बाजार समितीत सुमारे एक कोटी रुपये खर्च करून बाजार समिती शेतकऱ्यांसाठी शासकीय गोदाम उभारणार आहे. पणन मंडळाने त्यास मंजुरी दिली असून, कार्यादेशदेखील निघाला आहे.

 दरम्यान, नियोजित शासकीय गोदामाच्या जागेवर भुसार व फळ तसेच पालेभाज्या विक्रीस जागा कमी पडत असून, हे शासकीय गोदाम अन्यत्र उभारावे अशी मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली आहे. यासाठी गुरुवारी दिवसभर व्यापारी अडते यांचे धरणे आंदोलन सुरू आहे.

तातडीने तोडगा काढा

व्यापारी वर्गाने पुकारलेल्या बेमुदत बंदमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. मोठ्या प्रमाणात भाजीपाला व फळ विक्रीसाठी येत असतात. हा शेतमाल नाशवंत असल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. व्यापारी व बाजार समिती प्रशासनाने तातडीने चर्चेतून तोडगा काढून लिलाव सुरू करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com