शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते, कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार

शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते, कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते, कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार

सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून जिल्ह्यातील कृषी विक्रेत्यांनी आपला व्यवसाय प्रामाणिकपणे करावा, शेतकऱ्यांबद्दल माणुसकी जपावी. शेतकऱ्यांची फसवणूक करू नका, आपल्याकडील उपलब्ध खते, बियाणे वेळेत आणि तात्काळ त्यांच्यासाठी उपलब्ध करा, त्यासाठीचा दर्जा राखून ठेवा, त्यानंतरही जे विक्रेते, कंपन्या शेतकऱ्यांना फसवतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी दिली.  खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील कृषी विक्रेते, उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, पदाधिकारी व अधिकारी यांची कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार, कृषी अधिकारी साहेबराव बेंदगुडे, कृषी उपसंचालक रवींद्र माने, परमेश्‍वर वाघमोडे, मोहीम अधिकारी दत्तात्रेय येळे, श्रीधर जोशी यांच्यासह जिल्हा परिषद व राज्य सरकारच्या कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सोलापूर जिल्हा फर्टिलायझर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अॅड. चंद्रशेखर कौंडुभैरी, महेश चिवटे यांनी विक्रेत्यांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. येळे यांनी प्रास्ताविक केले. कल्याण श्रीवास्तव यांनी सूत्रसंचालन केले. सागर बावकर यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com