साखरेची ‘एमएसपी’पेक्षा कमी किमतीने मागणी

देशांतर्गत बाजारात साखरेची विक्री करण्याला अडचणी येत असल्याने आता कारखानदारांची गोची झाली आहे. व्यापाऱ्यांकडून किमान विक्री मूल्यापेक्षाही (एमएसपी) कमी किमतीने साखरेची मागणी केली आहे.
sugar
sugar

कोल्हापूर : देशांतर्गत बाजारात साखरेची विक्री करण्याला अडचणी येत असल्याने आता कारखानदारांची गोची झाली आहे. व्यापाऱ्यांकडून किमान विक्री मूल्यापेक्षाही (एमएसपी) कमी किमतीने साखरेची मागणी केली आहे. राज्यातील अनेक कारखाने शिल्लक साठा कमी करण्यासाठी या मागणीला बळी पडत असल्याचे चित्र आहे. यंदाचा साखर हंगाम कारखान्यांची परीक्षा पाहणारा ठरत आहे. हंगाम सुरू होऊन दोन महिने पूर्ण झाले तरीही साखर निर्यातीबाबत केंद्राने धोरण जाहीर केले नाही. मागचे अनुदान थकीत आहे. यातच स्थानिक बाजारातून मागणी रोडावली आहे. केंद्राने किमान विक्री मूल्यातही वाढ केली नाही. ३३०० रुपये विक्री मूल्य करण्याबाबतच्या हालचालीही थंड झाल्या आहेत. याचा फायदा देशातील व्यापारी उचलत असल्याचे सध्याचे चित्र असल्याची माहिती साखर उद्योगातील सूत्रांनी दिली. शिल्लक साखर कमी करणे हे कोणत्याही परिस्थितीत अपरिहार्य आहे. यामुळे साखरेचा उठाव व्हावा यासाठी कारखान्यांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. याचा फायदा घेऊन देशभरातील व्यापारी कमी दराने साखर मागणी करत आहेत. अनेक व्यापारी ३१०० रुपयांपेक्षाही कमी दरात साखरेची मागणी करीत आहेत. कमी दराने मिळाल्यास जादा साखर घेण्याचे आमिष दाखवले जात असल्याने कारखान्यांच्यामध्येही चलबिचलता वाढली आहे. थोडी कमी रक्कम घेऊन जादा साखर विकली तर किमान यंदाच्या हंगामासाठी पैसे तरी जमा होतील, असा एक मत प्रवाह काही कारखान्यांचा आहे. तर असे झाल्यास ते साखर उद्योगालाच घातक ठरणार असल्याने कारखाने ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्याच भूमिकेत आहेत. केंद्राने कडक भूमिका घ्यावी व्यापाऱ्यांच्या या भूमिकेमुळे साखर बाजारात अस्वस्थता पसरली आहे. केंद्राने याबाबत कडक भूमिका घ्यावी. उद्योगाच्या नुकसानीस कारणीभूत ठरणाऱ्या अशा व्यवहारात सहभागी असणारे कारखाने व व्यापारी दोघांवरही कारवाई करण्याची गरज असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले.

कागदोपत्री दाखवतात ‘एमएसपी’ने खरेदी कमी दराच्या कागदपत्रात अडकू नये यासाठी अनेक जण कागदोपत्री किमान विकी मूल्य दाखवून प्रत्यक्षात कमी दराने साखरेची खरेदी विक्री करत असल्याचे साखर उद्योगातून सांगण्यात आले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com