agriculture news in Marathi traders inter in direct vegetable selling Maharashtra | Agrowon

नागपूरात व्यापाऱ्यांची थेट शेतमाल विक्रीत घुसखोरी 

टीम अॅग्रोवन
रविवार, 19 एप्रिल 2020

लक्ष्मीनगर, धरमपेठ, बजाज नगर, उत्कर्ष नगर या भागात आम्ही थेट भाजीपाला विक्री करतो. लॉकडाऊननंतरही ग्राहकांचा विश्‍वास कायम राहावा याकरिता चांगल्या प्रतीचा भाजीपाला वाजवी दरात पुरविण्याची बांधीलकी जपली आहे. याउलट व्यापारी मात्र शेतकऱ्यांकडून कमी दराने घेऊन त्यात दलाली व इतर खर्चाचा समावेश करुन जादा दराने विक्री करीत आहेत. 
- कमलेश भोयर, कन्हान ॲग्रो व्हिजन फार्मर प्रोड्युसर कंपनी, कन्हान, नागपूर 

नागपूर ः कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजना अंतर्गत नागपूर जिल्ह्यात सुरुवातीला ५० शेतकरी गटांना थेट विक्रीची मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर मात्र त्या ठिकाणी व्यापाऱ्यांकडून घुसखोरी झाल्याने हळूहळू शेतकरी संख्या कमी होत गेली. आता केवळ २५ शेतकरी गटांकडूनच शहरात भाजीपाला विक्री केली जात आहे. दुसरीकडे काही भागातील शेतकरी व्यापाऱ्यांना भाजीपाल्याचा पुरवठा करीत आहेत. व्यापारी मात्र कमी दरात शेतकऱ्यांकडून भाजीपाला घेत त्याची जादा दराने विक्री करीत आहेत. 

कोरोना नियंत्रणासाठी नागपूर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली. या काळात ग्राहकांची भाजीपाला व इतर जिन्नस खरेदीत लुट होऊ नये याकरीता खबरदारी म्हणून शेतकऱ्यांना थेट शेतमाल विक्रीसाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला. नागपूर जिल्हयात कृषी विभागाच्या माध्यमातून मार्च महिन्यातच ५० शेतकरी गटांना भाजीपाला विक्रीसाठी परवाने देण्यात आले. ५० शेतकरी गटांकडून परवाने घेण्यात आल्यानंतर काही दिवस ४२ गटांकडून भाजीपाला विक्री झाली. त्यानंतर ही संख्या कमी होत ३४ शेतकरी गट आणि आता २४ ते २५ शेतकरी गटांपर्यंत मर्यादीत झाली आहे. 

उर्वरित ठिकाणी १४५ पेक्षा अधिक व्यापारी, अडते यांचेच प्राबल्या भाजीबाजारात दिसून येत आहे. कळमणा बाजार समिती तसेच कॉटन मार्केट परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याने कॉटन मार्केट परिसरात भाजी व्यवहारावर बंदी लादण्यात आली. त्यानंतर आठ ठिकाणी हा बाजार विभागण्यात आला. कळमणा बाजार समितीमध्ये भाजीपाला व्यवहाराकरीता आठवड्यातील तीन दिवस निश्‍चीत करण्यात आले आहेत. या ठिकाणी गर्दी नियंत्रण करताना बाजार समिती प्रशासनाच्या नाकीनऊ येत असल्याने ते त्रासले आहेत त्यातच पोलिसांकडून खबरदारी म्हणून ड्रोनव्दारे या परिसरात चित्रीकरण केले जाते. त्यामुळे कारवाईचा बडगा उगारल्या जाण्याची भिती देखील कळमणा बाजार समिती प्रशासनावर आहे. 

शहरात ठिकठिकाणी भरणाऱ्या भाजीपाला बाजारात शेतकऱ्यांकडून घेतलेला कमी किंमतीचा माल ग्राहकांना मात्र अव्वाच्या सव्वा दरात विकल्या जात आहे. शेतकऱ्यांची व ग्राहकांची या माध्यमातून पिळवणूक होत असल्याचे समोर आले आहे. 

शेतकऱ्यांचे विक्री दर आणि ग्राहकांचे खरेदी दर (प्रतिकिलो-रुपये) 

शेतमाल शेतकरी ग्राहक
पालक २७ ८० 
टोमॅटो ३० 
भेंडी २० ६५ 
शेवगा ३० ६० 
मिरची २८ ४५ ते ५० 
कोथींबीर ३० ६० 
वांगी ६ ते ७ २० 
कलींगड १० २० 
गवार २० ते २५ ५५ ते ६०
कांदा ७ ते ९ ३० 
कोबी २५ ४५ ते ५० 

प्रतिक्रिया
बाजारात टोमॅटो ३० ते ३५ रुपये किलो विकल्या जात असताना आम्हाला मात्र व्यापारी अवघ्या २ रुपये किलोने मागत आहेत. मोठ्या क्षेत्रावर टोमॅटो लावला आहे. त्यामुळे थेट विक्री करणे शक्‍य होत नाही. तोडणी आणि त्यांनतर विक्री ही कामे शक्‍य होणार नाही. परिणामी आता टोमॅटो फेकण्याची वेळ आली आहे. 
- अशोक चापले, कन्हान, नागपूर 
 


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...