agriculture news in Marathi traders looted to farmer and costumer Maharashtra | Agrowon

नगर : व्यापाऱ्यांकडून शेतकरी, ग्राहकांची लूट

टीम अॅग्रोवन
रविवार, 19 एप्रिल 2020

मी सिमला मिरचीची बाजारात नेवून विक्री करतो. नेहमीच्या तुलनेत पन्नास टक्केही दर मिळत नाही. त्यातून खर्चही निघत नाही. किरकोळ विक्रेतेही शेतकरय़ांपेक्षा जास्ती पैसा मिळवत आहेत. मात्र सध्याच्या परिस्थिती मिळेल त्या दरात विकल्याशिवाय पर्याय नाही.
- किरण चव्हाण, भाजीपाला उत्पादक शेतकरी, खेडले काजळी, ता. नेवासा, जि. नगर

नगर ः कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर नगर जिल्ह्यामध्ये नगर बाजार समिती वगळता अन्य बाजार समित्यात भाजीपाला, फळांची खरेदी विक्री बंद आहे. आठवडे बाजारही बंद आहेत. त्यामुळे नगरला खरेदीदारापेक्षा उत्पादक शेतकरी अधिक येत असल्याने खरेदीदार अगदी दर पाडून भाजीपाला, फळांची खरेदी करत आहेत. तर ग्राहकांना मात्र दुप्पट, तिप्पट दराने विक्री करत आहेत. त्यामुळे लाॅकडाऊनच्या काळात विक्रेत्यांपेक्षा खरेदीदारच मालामाल होत आहेत. विशेष म्हणजे भाजीपाला, फळांच्या पडलेल्या दरांबाबत कोणीही बोलत नाहीत. 

कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर भाजीबाजार बंद असल्याने भाजीपाला, फळे विकण्याचा प्रश्न निर्माण झाला. नगरला जिल्हाभरातील बाजार समित्या बंद करण्यात आल्या आहेत. आठवडीबाजार बंदं आहेत. मात्र सर्वाधिक खरेदी-विक्री होत असलेल्या नगर बाजार समितीत भाजीपाला, फळांची खरेदी-विक्री सुरु ठेवण्याची कृषी विभागाने विनंती केल्यानंतर नगरएवजी नेप्ती उपबाजारात फळे, भाजीपाल्याची खेरदी विक्री सुरु ठेवण्याला परवानगी दिल्यानंतर पंधरा दिवसापासून ती सुरु आहे.

येथे नगरसह शेजारच्या जिल्ह्यातील शेतकरी माल विक्रीसाठी घेऊन येत आहेत. आतापर्यत सुमारे एक हजार टनापेक्षा अधिक भाजीपाला, फळांची विक्री झाली असल्याचे कृषी विभाग सांगत आहे. मात्र येथे खरेदीदारापेक्षा उत्पादक शेतकरीच अधिक येत आहेत. 

शेतकरी थेट किरकोळ विक्री करणाऱ्यांना विक्री करत असले तरी खरेदीदार दर पाडूनच खरेदी करतात. बाजारात आलेल्या शेतकऱ्यांना मात्र विकल्याशिवाय पर्याय उरलेला दिसत नाही. किरकोळ विक्रेते ग्राहकांना मात्र शेतकऱ्यांकडून खरेदी केलल्या दराच्या तिप्पट दराने विक्री करत आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यात उत्पादकांपेक्षा खरेदीदारच अधिक मालामाल होत आहेत. शेतकऱ्यांचा माल सर्रासपणे दर पाडून खरेदी केला जात असल्याने त्याबाबत कोणीही बोलायला तयार नाही. 

शेतकरी आणि ग्राहक दर (प्रतीकिलो/रुपये )

शेतमाल शेतकरी ग्राहक 
टोमॅटो ७ ते १० २० ते २५  
वांगी १० ते १२ ३० ते ४० 
शेवगा १६ ते २० ४० ते ५० 
सिमला मिरची १५ ते २० ४० ते ५०
हिरवी मिरची १५ ते २० ४० ते ६० 
बटाटा १० ते १५ २० ते ३०  
फ्लॉवर ७ ते १० २० ते ४० 
कोबी ३ ते ४ १५ ते २० 
कोथिंबीर (जुडी) ३ ते ५ १० ते १५
कलिंगड ५ ते ७ २० ते ३० 
खरबुज ७ ते १० २५ ते ३५ 
द्राक्ष १२ ते १५ ३० ते ५०  
चिकु १० ते १५ ४० ते ५०

 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...