सोलापूर : शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांचीच दुकानदारी 

मी स्वतः भाजीपाला पिकवतो आणि रोज मंडईमध्ये भाजीपाल्याची विक्री करतो, पण तिथले व्यापारी, विक्रेते आम्हाला जमू देत नाहीत. बऱयाचवेळा ते म्हणतील, त्या दरात आम्हाला भाजीपाला विकून टाकावा लागतो. एकतर शेतातल्या कामाची गडबड असते, वेळेची आणि दिवसभराचे काम बघायचे असते. त्यामुळे विक्रेत्यांना माल विकून पटकन मोकळे व्हावे, या उद्देशाने माघारी फिरतो, सगळीकडे तेच आहे, दुसरा पर्याय नाही. -अप्पा कोरके, शेतकरी, गुळवंची, ता. उत्तर सोलापूर
vegetable
vegetable

सोलापूर ः कोरोनामुळे सध्या सोलापूर बाजार समितीतील भाजीपाला आणि कांदा व्यवहार बंद आहेत. पण त्याचा गैरफायदा घेत मध्यस्थ, व्यापारी आणि किरकोळ विक्रेते शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने भाज्या खरेदी करुन शहरातील ग्राहकांना अव्वाच्या सव्वा दर लावून विक्री करत आहेत. दर वाढलेले दिसत असूनही, यामध्ये शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाहीच. उलट ग्राहकांची अधिक लूट करताना व्यापारीच त्यात सर्वाधिक मालामाल होत असल्याचे चित्र आहे.  सोलापूर शहराला लागून असलेल्या उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापुरातून शहरात सर्वाधिक भाजीपाला पुरवठा होता. एरव्ही, बाजार समितीच्या माध्मयातून भाज्यांची खरेदी-विक्री होते. पण गेल्या पंधरवड्यापासून बाजार बंद असल्याने शहरातील अनेक भागात थेट शेतकरी स्वतःहून भाज्यांची विक्री करत आहेत. सोलापूर बाजार समितीने दोन दिवसापूर्वी शहरातील सहा ठिकाणे निश्चित केली आहेत. याठिकाणी केवळ शेतकऱ्यांनीच भाजीपाला विक्री करावा, असा नियम आहे.  पण आज यापैकी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या नावावर किरकोळ व्यापारी आणि विक्रेत्यांचीच घुसखोरी झाली आहे. त्याशिवाय शहरातील विजापूर रस्ता, सात रस्ता, स्टेशनरस्ता, कस्तुरबा मार्केट, लक्ष्मी मार्केट, आसरा मार्कट, यासारख्या छोट्या-मोठ्या चौकात बसणारे विक्रेते, फेरीवाले हे किरकोळ विक्रेते शेतकऱ्यांकडून टोमॅटो, वांगी, मेथी, कोथिंबिर, हिरवी मिरची, भेंडी, दोडका, कारले आदी भाजीपाल्यांची खरेदी करुन त्याची दुप्पटच नाही, तर तिप्पट- चौपट पैसे ग्राहकांकडून वसूल करत आहेत. पण शेतकऱ्यांकडून जेमेतम दरात त्याची खरेदी करत आहेत. अनेक शेतकरीही नाईलाजाने त्याला बळी पडत आहेत. मार्केट बंद असल्याने एवढा माल कधी आणि कसा विकणार, या चिंतेने विक्रेत्यांना पोचवून माघारी फिरत आहेत, त्याचा हे व्यापारी अधिक गैरफायदा घेत आहेत.  शेतकऱ्यांकडील वांगी, टोमॅटोची खरेदी सध्या केवळ ५ रुपये किलोने होते आहे. पुढे त्याला विक्रेते ४० रुपये किलोने विक्री करत आहेत. कोथिंबिर, मेथी, शेपू २ ते ३ रुपये आणि प्रत्यक्षात १० ते १५ रुपयाला पेंढी विक्री होते आहे. हिरवी मिरची, बटाटा ५ ते १० रुपये किलोने खरेदी केला जातो, तर विक्रेते त्याची ३५ ते ४० रुपये किलोने विक्री करत आहेत. यावर कोणाचेच नियंत्रण नाही. त्यात शेतकऱ्यांचे कोणतेही संघटन नाही, मात्र, या व्यापाऱ्यांचे, विक्रेत्यांचे संघटन मजबूत आहे. त्यामुळे ग्राहकही त्याला तोंड देऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com