Agriculture news in Marathi The trader's ploy to sell tires at the NAFED center failed | Agrowon

नाफेड केंद्रावर तूर विकण्याचा व्यापाऱ्याचा डाव फसला

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 जून 2020

अमरावती ः शेतकऱ्याच्या नावावर नोंदणी करुन हमीभाव केंद्रावर तूर विकण्याचा प्रयत्न एका व्यापाऱ्याकडून झाल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. अचलपूर बाजार समितीने याची गंभीर दखल घेतली आहे.

अमरावती ः शेतकऱ्याच्या नावावर नोंदणी करुन हमीभाव केंद्रावर तूर विकण्याचा प्रयत्न एका व्यापाऱ्याकडून झाल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. अचलपूर बाजार समितीने याची गंभीर दखल घेत अडते, व्यापारी व शेतकऱ्याला नोटीस बजावत मंगळवारी (ता. २) सुनावणीस हजर राहण्याचे बजावले आहे.

व्यापारी रवी गुप्ता यांनी अडते मोनेश ट्रेडर्सचे संचालक मधुसूदन अग्रवाल यांच्याकडून शुक्रवारी (ता. २९) मे रोजी तूर विकत घेतली. परंतू, बिल गव्हाचे घेतले. अमरावती मार्गावरील बाजार समितीच्या प्रवेशव्दारावर गहू या शेतमालाचाच सेस भरुन वाहन आवाराबाहेर नेले. ते वाहन थेट टीएमसी यार्ड गेटमधून शासकीय हमीभाव केंद्रावर पाठविण्यात आले. शासकीय हमीभाव केंद्रावर एका वादग्रस्त संस्थेव्दारा तूरीची खरेदी होत आहे. त्याच ठिकाणी व्यापारी रवी गुप्ता यांच्याव्दारे तूर विकण्याचा प्रयत्न झाला.

दरम्यान या प्रकाराचा खुलासा झाल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली. बाजार समितीमधून थेट हमीभाव केंद्रावर पोहचलेल्या त्या वाहनात गव्हाऐवजी तूर होती व त्या मालाचे मोजमाप सुरू होते. ही बाब गंभीर स्वरुपाची असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. या दरम्यान अडते मोनेश ट्रेडर्सला विक्री पुस्तकाचा गैरवापर केल्याबाबत खुलासा मागण्यात आला आहे.

अडत दुकानातून तूर विकत घेतल्यानंतर त्याचेच बिल बनविणे अपेक्षित होते. परंतु गहू या कृषीमालाचे बिल तयार झाले. बिलानुसार गव्हाचाच सेस रवि गुप्ता यांनी भरल्याचेही नोटीसीमध्ये म्हटले आहे. शेतकऱ्याच्या नावे व्यापाऱ्याने मोजलेली १३ क्‍विंटल तूर बाजार समितीने जप्त केली आहे. हे प्रकरण आता कोणते वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

शेतकऱ्यांना देखील बजावली नोटीस
सावळी येथील शेकरी हरिभाऊ गावंडे आणि किसनराव गावंडे यांनाही बाजार समितीने नोटीस बजावली आहे. हमीभाव केंद्रावर पंचनामा करतेवेळी हजर नव्हते तरी कृषीमालाची नोंदणी रजिस्टरमध्ये कोणी केली, याबाबत त्यांना खुलासा मागण्यात आला आहे.

व्यापारी रवी गुप्ता, अडते मधुसूदन अग्रवाल तसेच ज्या शेतकऱ्यांच्या नावावर नोंदणी करुन तूर विकण्याचा प्रयत्न झाला. त्या सर्वांनाच चौकशीकामी बोलावले आहे. त्यातील तथ्या आधारे पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे.
- मंगेश भेटाळू, सहाय्यक सचिव, बाजार समिती, अचलपूर


इतर ताज्या घडामोडी
पुणे शहरालगतच्या रुग्णालयांमधील ८०...पुणे  : शहरालगतच्या गावांमध्ये कोरोनाबाधित...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळी ...कोल्हापूर  : दिल्ली सरकारने शंभर...
शेळ्या, मेंढ्यांचे बाजार सुरु करण्याची...नगर  ः सध्या आषाढ महिना सुरु असून या...
गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण करण्यासाठी...भंडारा   : गोसेखुर्द प्रकल्प २०२३...
खासगी दूध संघांनी दुधाला २५ रुपये दर...नगर ः दुधाला दर मिळत नसल्याने दुग्धोत्पादन अडचणीत...
नांदेड जिल्ह्यात ९२ टक्के क्षेत्रावर...नांदेड ः यावर्षीच्या (२०२०) खरीप हंगामात नांदेड...
नगर जिल्ह्यात युरियाची टंचाई कायम नगर  ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना...
नगर जिल्ह्यात युरिया टंचाई कायमनगर ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना युरिया...
पुणे विभागात खरिपाचा सव्वासात लाख...पुणे ः जूनच्या सुरुवातील पुणे विभागातील अनेक...
आमगाव खडकी गावाने सहायता निधीला मदत देत...वर्धा  ः गावातील मार्गावरुन जाणाऱ्या...
लासलगाव बाजार समितीत आजपासून शेतमालाचे...नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात...
औरंगाबादेत २४ लाख क्विंटल कापूस खरेदीऔरंगाबाद : जिल्ह्यात कापूस पणन महासंघ (सीसीआय),...
नांदेड, परभणी, हिंगोलीत हरभऱ्याची...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
गुजरातमधील अवैध एचटीबीटी उत्पादनाला...नागपूर ः बीटी नंतर एचटीबीटी (तणनाशक सहनशील)...
खाजगी दुध संघांनी दूधाला २५ रुपये दर ...नगर  ः दुधाला दर मिळत नसल्याने दुग्धोत्पादक...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळीकोल्हापूर : दिल्ली सरकारने शंभर युनिटपर्यंतचे वीज...
पुणे विभागात खरिपाची सात लाख ३४ हजार...पुणे   ः जूनच्या सुरूवातील पुणे...
पुण्यात सर्वच भाजीपाल्याच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
अन्नधान्यासह हाताला काम मिळणे गरजेचे ः...नाशिक : आपली अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक...
तापमान वाढीची प्रक्रिया रोखण्यासाठी...ओस्लो (नॉर्वे) येथील ‘सेंटर फॉर इंटरनॅशनल...