agriculture news in Marathi traders sell tur on MSP which was purchase on low rate Maharashtra | Agrowon

कमी दरात तूर घेऊन विकली हमीभावाने; दोन व्यापाऱ्यांना अटक

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 जानेवारी 2020

यवतमाळ ः गेल्या हंगामात शेतकऱ्यांकडून कमी दरात तुरीची खरेदी करून त्याची शासकीय केंद्रावर हमीभावाने विक्री करणाऱ्या दोघा व्यापाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. तब्बल एक कोटी ४१ लाख ८२ हजार ८६३ रुपयांची फसवणूक या प्रकरणात शासनाची करण्यात आली.

 धर्मेद्र ढोले (रा. नातूवाडी, दारव्हा), महेश ऊर्फ महेश्‍वर भोयर (रा. शेलोडी, दारव्हा) अशी या व्यापाऱ्यांची नावे आहेत. या प्रकरणी जिल्हा उपनिबंधक तथा प्रभारी मार्केटिंग अधिकाऱ्यांनी १३ ऑक्‍टोंबर २०१८ रोजी दारव्हा पोलिसात तक्रार दिली होती.

यवतमाळ ः गेल्या हंगामात शेतकऱ्यांकडून कमी दरात तुरीची खरेदी करून त्याची शासकीय केंद्रावर हमीभावाने विक्री करणाऱ्या दोघा व्यापाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. तब्बल एक कोटी ४१ लाख ८२ हजार ८६३ रुपयांची फसवणूक या प्रकरणात शासनाची करण्यात आली.

 धर्मेद्र ढोले (रा. नातूवाडी, दारव्हा), महेश ऊर्फ महेश्‍वर भोयर (रा. शेलोडी, दारव्हा) अशी या व्यापाऱ्यांची नावे आहेत. या प्रकरणी जिल्हा उपनिबंधक तथा प्रभारी मार्केटिंग अधिकाऱ्यांनी १३ ऑक्‍टोंबर २०१८ रोजी दारव्हा पोलिसात तक्रार दिली होती.

तक्रारीनुसार, दारव्हा तालुक्‍यातील धर्मेंद्र ढोले आणि महेश ऊर्फ महेश्‍वर भोयर या दोन व्यापाऱ्यांनी तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडून कमी किमतीमध्ये तुरीची खरेदी केली. त्यानंतर ती तूर दारव्हा बाजार समिती आणि खरेदी-विक्री संघात नाफेडला जादा दराने विकली. या माध्यमातून शासनाची १ कोटी ४१ लाख ८२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचेही तक्रारीत म्हटले होते.

या प्रकरणी दारव्हा पोलिसात या दोघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु, त्यानंतर आरोपींनी सत्र न्यायलायात जामिनासाठी अर्ज केला होता. तो फेटाळण्यात आला. तेव्हापासून दोन्ही व्यापारी फरार होते. त्यांच्या अटकेचे आदेश पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक राहुलकुमार राऊत यांनी आरोपींची शोधमोहीम राबवीत त्यांना अटक केली. 
 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात गोंधळलेले सरकार: देवेेंद्र...मुंबई ः दिशा ठरत नाही आणि त्यांना सूरही गवसत...
कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्य सरकारची...मुंबई : आजपासून (ता. २४) सुरू होणारे अर्थसंकल्पी...
अकरा लाख टन रिफाइंड पामतेल आयातीला...नवी दिल्ली: केंद्र सरकारने रिफाइंड पामतेलाची...
कर्जमाफी बिनकामाची, तकलादू : राजू...नगर: पंतप्रधान पीकविमा योजना सरकारी...
पूर्व विदर्भात पावसाचा अंदाजपुणे  : पावसासाठी पोषक हवामान असल्याने पूर्व...
‘ठिबक’च्या ऑनलाइन अर्जासाठी मुदतवाढपुणे ः ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन...
विदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...
सांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या...
शेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...
ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या...
अठ्ठेचाळीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...
सिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात आंब्याला...सिंधुदुर्ग: फेब्रुवारी महिना संपत आला तरी...
पशुधनाचे मार्चमध्ये होणार लसीकरणपुणे ः गाई, म्हशी, शेळ्या, कालवडी आजारी पडू नये...
निर्धारित निर्यातीनंतरच बफर स्टॉकवरील...नवी दिल्ली: देशातील ज्या साखर कारखान्यांनी...
खारपाण पट्ट्यातील येऊलखेड बनले कृषी...अकोला: विदर्भाची पंढरी शेगाव हे संपूर्ण...
जळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
इंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...
चांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...
सर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...
विदर्भात पावसाला पोषक हवामान पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...