agriculture news in marathi Traders toget three days after purchasing Onion in APMC, Centers New Decision | Agrowon

कांदा खरेदीनंतर व्यापाऱ्यांना मिळणार तीन दिवसांचा अवधी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

बाजार समितीत कांदा खरेदी केल्यानंतर व्यापाऱ्यांना हाताळणी व प्रतवारी करण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी मिळणार आहे.

नाशिक : बाजार समितीत कांदा खरेदी केल्यानंतर व्यापाऱ्यांना हाताळणी व प्रतवारी करण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी मिळणार आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने कांद्याचे लिलाव सुरळीत होऊन कांदा व्यापाऱ्यांना काम करता यावे या हेतूने हा अवधी देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ.भारती पवार यांनी दिली. 

कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातबंदीनंतर व्यापाऱ्यांच्या कांदा साठवणुकीवर केंद्रीय आदेश ३७७६ ‘अ’ नुसार २३ ऑक्टोबर रोजी मर्यादा आणली. श्री. पवार म्हणाल्या की, केंद्राच्या  ग्राहक संरक्षण, अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने शेतकरी व व्यापारी यांची होत असलेली अडचण सोडविण्यासाठी केंद्रीय पातळीवर चर्चा केली. त्यानुसार केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी यावर विचार विनिमय करून हा निर्णय घेतला. त्यानुसार बाजार समितीत कांदा खरेदी केल्यानंतर पुढील तीन दिवस अवधी हाताळणी व प्रतवारी करण्यासाठी देण्यात आला आहे. 

याबाबतचे पत्र ग्राहक संरक्षण विभागाचे सीता राम मीना यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले आहे. त्यानुसार देशातील राज्य व संघ राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभागाला सूचना देण्यात याव्या, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा कांदा लिलाव कामकाजात गती येईल असे बोलले जात आहे. 


इतर बातम्या
रत्नागिरी, संगमेश्‍वरसाठी भात खरेदी सुरूरत्नागिरी  : रत्नागिरी व संगमेश्‍वर...
चक्रीवादळांचा तडाखा यंदा वाढलापुणे : चक्रीवादळ निर्मिती नैसर्गिक असली, तरी...
खानदेशात यात्रांअभावी अनेकांवर...सोनगीर, जि. धुळे  : खानदेशात पावसाळा वगळता...
नाशिक जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीसाठी...गिरणारे, जि. नाशिक : खरीप हंगामातील भात, भुईमूग,...
खांबाळे, पडवणे येथील आंबा, काजूची ६००...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील खांबाळे (ता....
बोडखा येथे ‘स्वाभिमानी’चे झाडावर...बुलडाणा : केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी...
औरंगाबादमध्ये केंद्राच्या कृषी...औरंगाबाद : केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी...
खानदेशात सव्वा लाख हेक्टरवर पेरणीजळगाव : खानदेशात मक्याची लागवड सुरूच आहे. रब्बी...
परभणी जिल्ह्यात कापूस विक्रीच्या...परभणी : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
नाशिक विभागात रोज एक लाख टन उसाचे गाळपनगर  ः नाशिक विभागातील ३२ पैकी २५ साखऱ...
औरंगाबाद, नगर जिल्ह्यात कापसाची ३४ हजार...औरंगाबाद : राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या...
कृषी कायद्यांविरोधात साताऱ्यात धरणेसातारा : शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यासाठी...
साखरेची ‘एमएसपी’पेक्षा कमी किमतीने मागणीकोल्हापूर : देशांतर्गत बाजारात साखरेची विक्री...
जालना जिल्ह्यात दहा हजार क्‍विंटलवर...जालना : ‘‘जिल्ह्यात मक्याची किमान आधारभूत...
काजू उत्पादकांना दिलासामुंबई : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील काजू...
का येताहेत चक्रीवादळे? भारताच्या पूर्व भागात असलेला बंगालचा उपसागर,...
कृषी कायद्यांविरोधात राज्यात...पुणे ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी आणि पणन...
किसान समन्वय समितीचा अकोले येथे मोर्चा नगर ः केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना...
महिनाभर जमीन आरोग्य सुधार अभियानऔरंगाबाद : जमिनीच्या सुपीकतेवर भर देण्याची गरज...
दक्षिण भारतात मुसळधार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेले बुरेवी...