Agriculture news in marathi Traffic ban destroy silk cell in Kolhapur | Agrowon

कोल्हापुरात वाहतुक बंदीचा रेशीम कोषाला फटका

टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 एप्रिल 2020

शासनाने तयार रेशीम कोष खरेदी करण्याची व्यवस्था करावी. तुतीच्या बागा तोडल्यामुळे होणाऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी. 
- आप्पासाहेब झुंजार, जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा रेशीम उत्पादक. 

कोल्हापूर : वाहतूक बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे तयार रेशीम कोष मार्केटमध्ये पाठवता येत नाहीत. त्यामुळे कोष खराब होऊन नुकसान होत आहे. तर, दुसरीकडे नवीन उत्पादनासाठी अंडी पुंज मिळत नसल्यामुळे लागवड केलेली तुतीची बाग तोडून टाकायची वेळ आली आहे. या दुहेरी संकटात रेशीम उत्पादक शेतकरी सापडला आहे. 

जिल्ह्यात जवळपास ५०० हून अधिक शेतकरी रेशीम शेती करतात. अवघ्या २५ दिवसांत अंडी, अळी व कोष निर्माण होण्याची प्रकिया घडत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला डोळ्यात तेल घालून काम करावे लागते. अळीच्या वेगवेगळ्या स्टेजप्रमाणे तुतीच्या पानाची खाद्य म्हणून जोपासना करावी लागते. वर्षभरात एक शेतकरी जवळपास आठ ते नऊ पिके घेतो. त्याप्रमाणे त्याचे नियोजन असते. 

तयार रेशीम कोष वेळेत मार्केटमध्ये पोहचावे लागतात. अन्यथा, कोषातील अळीचे फुलपाखरात रूपांतर होते. त्यावेळी फुलपाखरू कोष तोडून बाहेर पडतो. त्यामुळे साहजिकच रेशीम धागे तुटतात. हे धागे कोणी खरेदी करीत नाहीत. असे तयार कोष अनेक शेतकऱ्यांनी तयार केले आहेत. पण, ते मार्केटमध्ये पाठवायची सोय नसल्यामुळे कोष खराब होत आहेत. 

 

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...