जनावरांची दूध देण्याची क्षमता ही प्रामुख्याने जनावरांच्या जाती, प्रजाती, आनुवांशिकता, वेत
अॅग्रो विशेष
पुण्यात वादळी पावसाचा धुमाकूळ; वाहतूकीचा मोठा खोळंबा
पुणे : शहरात आज (ता.९) सायंकाळी सहा वाजेच्या पुढे विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह आलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची चांगली तारांबळ उडाली. काही ठिकाणी लहान आकाराच्या गारा पडल्याने एकच धावपळ झाली. रस्त्यांना नाल्याचे स्वरुप येऊन अनेक ठिकाणी वाहतुक खोळंबली. झाडे तुटल्याने रस्ते बंद होऊन आणि विजेचाही खोळंबा झाला.

पावसाच्या सरी कोसळताच वाहनांची प्रचंड वर्दळ असलेल्या रस्त्यांवर ओढ्या-नाल्यांसारखे पाणी तुंबले आणि कर्वे रस्ता, प्रभात रस्ता, विधी महाविद्यालय, सिंहगड रस्त्यांवरील वाहतूक खोळंबली. भरीस भर म्हणजे, काही ठिकाणी रस्त्यांलगतची झाडे पडल्याने वाहनचालकांमध्ये घबराट पसरली. दोन आठवड्यापूर्वीच्या मुसळधार पावसाच्या आठवणीने वाहनचालकांच्या पोटात भीतीचा गोळा आला. परिणामी, आधीच पावसाने धडकी भरलेल्या पुणेकरांना काही मिनिटांतच वाहतूक कोंडीत अडकावे लागले. संतोष हॉल ते सनसिटी मार्गावर झाड पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.
सिंहगड रोडचा वादळी पाऊस..पहा video
कर्वे रस्त्यावरील अभिनव चौक आणि आजूबाजुचा भाग पूर्णपणे पाण्यात असल्याने भीतीपोटी वाहनेच पुढे सरकू शकली नाहीत. त्यामुळे वाहनांची भलीमोठी रांग लागली; तेवढ्यात गरवारे महाविद्यालयाजवळील झाड पडल्याने वाहनचालकांची धावपळ उडाली. त्याचवेळी विधी महाविद्यालय रस्त्यावरची वाहने पाण्यातच उभी होती. प्रभात रस्त्याच्याकडेला बहुतांशी ठिकाणी पाण्याची डबकी साचल्याने वाहतुकीचा वेग कमी झाला. कर्वे रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता आणि प्रभात रस्त्यांवर एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने या रस्त्यांचा वापर करणाऱ्या वाहनचालकांना पर्यायी रस्ताच नव्हता. त्यामळे या तिन्हर रस्त्यांवर पाऊस, पाणी, कोंडी आणि भीतीचे वातावरण होते.
- 1 of 435
- ››