agriculture news in marathi, traffic jam due to heavy rain in pune city | Page 2 ||| Agrowon

पुण्यात वादळी पावसाचा धुमाकूळ; वाहतूकीचा मोठा खोळंबा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

पुणे : शहरात आज (ता.९) सायंकाळी सहा वाजेच्या पुढे विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह आलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची चांगली तारांबळ उडाली. काही ठिकाणी लहान आकाराच्या गारा पडल्याने एकच धावपळ झाली. रस्त्यांना नाल्याचे स्वरुप येऊन अनेक ठिकाणी वाहतुक खोळंबली. झाडे तुटल्याने रस्ते बंद होऊन आणि विजेचाही खोळंबा झाला. 

पुणे : शहरात आज (ता.९) सायंकाळी सहा वाजेच्या पुढे विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह आलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची चांगली तारांबळ उडाली. काही ठिकाणी लहान आकाराच्या गारा पडल्याने एकच धावपळ झाली. रस्त्यांना नाल्याचे स्वरुप येऊन अनेक ठिकाणी वाहतुक खोळंबली. झाडे तुटल्याने रस्ते बंद होऊन आणि विजेचाही खोळंबा झाला. 

पावसाच्या सरी कोसळताच वाहनांची प्रचंड वर्दळ असलेल्या रस्त्यांवर ओढ्या-नाल्यांसारखे पाणी तुंबले आणि कर्वे रस्ता, प्रभात रस्ता, विधी महाविद्यालय, सिंहगड रस्त्यांवरील वाहतूक खोळंबली. भरीस भर म्हणजे, काही ठिकाणी रस्त्यांलगतची झाडे पडल्याने वाहनचालकांमध्ये घबराट पसरली. दोन आठवड्यापूर्वीच्या मुसळधार पावसाच्या आठवणीने वाहनचालकांच्या पोटात भीतीचा गोळा आला. परिणामी, आधीच पावसाने धडकी भरलेल्या पुणेकरांना काही मिनिटांतच वाहतूक कोंडीत अडकावे लागले. संतोष हॉल ते सनसिटी मार्गावर झाड पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. 

सिंहगड रोडचा वादळी पाऊस..पहा video

कर्वे रस्त्यावरील अभिनव चौक आणि आजूबाजुचा भाग पूर्णपणे पाण्यात असल्याने भीतीपोटी वाहनेच पुढे सरकू शकली नाहीत. त्यामुळे वाहनांची भलीमोठी रांग लागली; तेवढ्यात गरवारे महाविद्यालयाजवळील झाड पडल्याने वाहनचालकांची धावपळ उडाली. त्याचवेळी विधी महाविद्यालय रस्त्यावरची वाहने पाण्यातच उभी होती. प्रभात रस्त्याच्याकडेला बहुतांशी ठिकाणी पाण्याची डबकी साचल्याने वाहतुकीचा वेग कमी झाला. कर्वे रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता आणि प्रभात रस्त्यांवर एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने या रस्त्यांचा वापर करणाऱ्या वाहनचालकांना पर्यायी रस्ताच नव्हता. त्यामळे या तिन्हर रस्त्यांवर पाऊस, पाणी, कोंडी आणि भीतीचे वातावरण होते. 


इतर बातम्या
पावसाचा जोर वाढण्याची शक्यता  पुणे ः  बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...
दूध प्रश्न बाजूला; शेतकरी संघटनांमधील...कोल्हापूर  : दूध दरप्रश्नी सरकारवर दबाव...
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक;...मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या...
राज्यात धरणांमध्ये ३८ टक्के साठापुणे : मॉन्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर जून...
मागण्यांसाठी मराठवाड्यात दूध...औरंगाबाद : दूध उत्पादन खर्चाच्या तुलनेत परवडणारा...
परभणी जिल्ह्यात रास्ता रोको, दूध संकलन...परभणी : दूध दरवाढीसाठी भाजपतर्फे शनिवारी (ता.१)...
दूध दरप्रश्नी आंदोलनाला विदर्भात...नागपूर : दूध दरप्रश्नी भाजपच्या वतीने...
दूध दरप्रश्नी भाजपचे सातारा जिल्ह्यात...सातारा  : गाईच्या दुधाला प्रतिलिटर १० रुपये...
जुलैअखेर पावसाने सरासरी गाठलीपुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) हंगामाची...
नगर जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलननगर  ः गायीच्या दुधाला ३० रुपये प्रतिलिटर दर...
नांदेडमध्ये दूध दरप्रश्नी एल्गारनांदेड : रयत क्रांती संघटनेतर्फे शनिवारी (ता...
सांगलीत दूध रस्त्यावर ओतून, सरकारचा...सांगली  : ‘सरकारची माया आटली, दूध...
काटेपूर्णा प्रकल्पात ८६ टक्के पाणीसाठाअकोला  : जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी एक...
महायुतीचे वऱ्हाडात दूध दरप्रश्नी आंदोलनअकोला  ः दूध उत्पादकांनासरसकट १० रुपये...
सांगली जिल्ह्यात २६ हजार हेक्टरने ऊस...सांगली : जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यासह अन्य...
मुगावर काय फवारायचे?अकोला ः कडधान्य वर्गीय पिकांपैकी एक प्रमुख...
दूध दरप्रश्नी कोल्हापुरात भाजपचा ‘...कोल्हापूर  : दुधाला प्रतिलिटर १० रुपये तर...
दूध दरप्रश्नी महायुतीचे नाशिक जिल्ह्यात...नाशिक  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर दूध...
रत्नागिरीत साडेसहा हजार हेक्टरवर फळबाग...रत्नागिरी  ः राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी...
पुणे विभागीय आयुक्तपदाची सूत्रे सौरभ...पुणे: पुणे विभागीय आयुक्तपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी...