trafficking Pangolin in sindhudurg, three arested
trafficking Pangolin in sindhudurg, three arested

जिवंत खवले माजंराच्या तस्करीप्रकरणी तिघांना अटक

सिंधुदुर्ग ः जिवंत खवले मांजराची तस्करी करणाऱ्या गगनबावडा (जि. कोल्हापूर) येथील तिघांना कोल्हापूर वन विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मांगवलीतील (ता. वैभववाडी) दोघांचा, तर सांगलीतील एकाचा समावेश आहे. दरम्यान, संशयितांच्या घराची झडती घेतली असता अधिकाऱ्यांना एक विनापरवाना बंदूक आढळून आली. तिघांनाही न्यायालयात हजर केले असता, त्यांना सहा दिवसांची कोठडी देण्यात आली.

वन विभागाने अटक केलेल्यांमध्ये अनिकेत अकुंश संसारे (वय २२), नितीन अनंत रामाणे (वय २३, दोन्ही रा. मांगवली), रमेश आनंदा खामकर, (वय ३५, रा. इटकरे, जि. सांगली) यांचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा येथे खवले मांजर घेऊन विक्रीसाठी येणार असल्याची माहीती कोल्हापूर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. 

त्या माहितीच्या आधारे कोल्हापूर फिरत्या पथकाचे प्रमुख युवराज पाटील, वनरक्षक सागर पटकारे, सांगलीचे वनपाल एस. व्ही. पारधी, वनरक्षक बाबु कोळी यांच्या पथकाने २० डिसेंबरला गगनबावडा येथे सापळा रचला होता. येथून या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील पिशवीत जिवंत खवले मांजर आढळून आले. त्यांनी खवले मांजर विक्रीसाठी आणल्याचे कबूल केले. 

दहा लाख रुपये किमतीला ते मांजर विकणार असल्याचेही त्यांनी अधिकाऱ्यांकडे मान्य केले. संशयितांत मांगवली येथील दोघांचा समावेश असल्यामुळे ही माहिती सिंधुदुर्ग वन विभागाला देण्यात आली. वन विभागाने तिघांविरुद्ध वन्यप्राणी विक्री करणे, वाहतूक करणे, ताब्यात ठेवण्यासाठी असलेल्या भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 

काळ्या जादूसाठी वापर खवले मांजरांची तस्करी वेगवेगळ्या कारणांसाठी केली जाते. ४० ते ५० हजार रुपयाला खवल्यांची विक्री होते. काळ्या जादूसाठी कितीही किंमत मोजली जाते. ज्याअर्थी या मांजरासाठी दहा लाख रुपये मोजले जाणार होते, त्याअर्थी हे मांजर काळ्या जादूसाठीच नेले जात असण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे वन विभागाने काळ्या जादूचे रॅकेटचा शोध घेणे आवश्‍यक आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com