परभणी ः ‘‘परभणी जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात कृषी तसेच पशुसंवर्धन
ताज्या घडामोडी
पशू प्रथमोपचारासाठी औषधी वनस्पती फायदेशीर : डॉ. अविनाश देव
नगर : रासायनिक औषधांच्या वापरामुळे जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. आजारामुळे दूध उत्पादनात घट येते, हे लक्षात घेऊन औषधी वनस्पतींचा पशू उपचारात वापर उपयुक्त दिसतो, असा सल्ला बायफ संस्थेचे कार्यक्रम समन्वयक डॉ. अविनाश देव यांनी दिला.
नगर : रासायनिक औषधांच्या वापरामुळे जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. आजारामुळे दूध उत्पादनात घट येते, हे लक्षात घेऊन औषधी वनस्पतींचा पशू उपचारात वापर उपयुक्त दिसतो, असा सल्ला बायफ संस्थेचे कार्यक्रम समन्वयक डॉ. अविनाश देव यांनी दिला.
गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या कार्यस्थळावर पुणे येथील बायफ संस्थेतर्फे पारंपरिक पशुऔषधोपचार पद्धतीची ओळख आणि जागृती या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रशिक्षणात संकरित गोपैदास केंद्रातील पशूतज्ज्ञ सहभागी झाले होते. या वेळी डॉ. देव बोलत होते. संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी आणंद (गुजरात) येथील भारतीय राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशन लि. या महासंघाच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल श्री. परजणे पाटील यांचा बायफ संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
या वेळी डॉ. देव म्हणाले, की जनावरांच्या आजारावर उपचार करण्यासाठी औषधी वनस्पतींचा वापर फायदेशीर आहे. त्यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहाते. तसेच खर्चही कमी येतो. जनावरांवर उपचारासाठी उपयुक्त वनस्पतींचे संवर्धन करण्याची गरज आहे. या वनस्पतींची शेताच्या बांधावर लागवड करावी. पूर्वीपासून आपल्याकडे जनावरातील रोगप्रतिकारशक्ती वाढावी, कृमीनाशक आणि कफनाशक म्हणून औषधी वनस्पतींचा वापर केला जात होता. तुळस, भुईआवळी, अश्वगंधा, शतावरी, कडुनिंब, कंबरमोडी, मेंदी यांसारख्या अनेक औषधी वनस्पती आपल्या अवतीभोवती आहेत. त्यांचा उपयोग योग्य प्रमाणात केल्यास जनावरांचे आरोग्य चांगले राहू शकते.
बायफ संस्थेने औषधी वनस्पतींच्या प्रसार आणि त्यांच्या पशू उपचारात उपयोग वाढविण्यासाठी हाती घेतलेला उपक्रम पशुपालकांच्यासाठी फायदेशीर आहे. गोदावरी दूध संघाच्या कार्यक्षेत्रात या उपक्रमाचा प्रारंभ येत्या २१ जूनपासून करण्यात येणार असल्याची माहिती राजेश परजणे पाटील यांनी दिली.
कार्यक्रमाला बायफचे कार्यक्रम अधिकारी सदाशिव निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक रोहिणी गाडे, नाशिक येथील डॉ. शब्बीरोद्दीन शेख, विभागीय अधिकारी डॉ. बाळासाहेब जिगळेकर, प्रकल्प अधिकारी सुधाकर बाबर, भालचंद्र राऊत आदी उपस्थित होते.
- 1 of 1064
- ››