agriculture news in marathi, training on animals medical treatment, nagar, maharashtra | Page 2 ||| Agrowon

पशू प्रथमोपचारासाठी औषधी वनस्पती फायदेशीर : डॉ. अविनाश देव
टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 मे 2019

नगर  : रासायनिक औषधांच्या वापरामुळे जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. आजारामुळे दूध उत्पादनात घट येते, हे लक्षात घेऊन औषधी वनस्पतींचा पशू उपचारात वापर उपयुक्त दिसतो, असा सल्ला बायफ संस्थेचे कार्यक्रम समन्वयक डॉ. अविनाश देव यांनी दिला. 

नगर  : रासायनिक औषधांच्या वापरामुळे जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. आजारामुळे दूध उत्पादनात घट येते, हे लक्षात घेऊन औषधी वनस्पतींचा पशू उपचारात वापर उपयुक्त दिसतो, असा सल्ला बायफ संस्थेचे कार्यक्रम समन्वयक डॉ. अविनाश देव यांनी दिला. 

गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या कार्यस्थळावर पुणे येथील बायफ संस्थेतर्फे पारंपरिक पशुऔषधोपचार पद्धतीची ओळख आणि जागृती या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रशिक्षणात संकरित गोपैदास केंद्रातील पशूतज्ज्ञ सहभागी झाले होते. या वेळी डॉ. देव बोलत होते. संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी आणंद (गुजरात) येथील भारतीय राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशन लि. या महासंघाच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल श्री. परजणे पाटील यांचा बायफ संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

या वेळी डॉ. देव म्हणाले, की जनावरांच्या आजारावर उपचार करण्यासाठी औषधी वनस्पतींचा वापर फायदेशीर आहे. त्यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहाते. तसेच खर्चही कमी येतो.  जनावरांवर उपचारासाठी उपयुक्त वनस्पतींचे संवर्धन करण्याची गरज आहे. या वनस्पतींची शेताच्या बांधावर लागवड करावी. पूर्वीपासून आपल्याकडे जनावरातील रोगप्रतिकारशक्ती वाढावी, कृमीनाशक आणि कफनाशक म्हणून औषधी वनस्पतींचा वापर केला जात होता. तुळस, भुईआवळी,  अश्वगंधा, शतावरी, कडुनिंब, कंबरमोडी, मेंदी यांसारख्या अनेक औषधी वनस्पती आपल्या अवतीभोवती आहेत. त्यांचा उपयोग योग्य प्रमाणात केल्यास जनावरांचे आरोग्य चांगले राहू शकते.

बायफ संस्थेने औषधी वनस्पतींच्या प्रसार आणि त्यांच्या पशू उपचारात उपयोग वाढविण्यासाठी हाती घेतलेला उपक्रम पशुपालकांच्यासाठी फायदेशीर आहे. गोदावरी दूध संघाच्या कार्यक्षेत्रात या उपक्रमाचा प्रारंभ येत्या २१ जूनपासून करण्यात येणार असल्याची माहिती राजेश परजणे पाटील यांनी दिली.

कार्यक्रमाला बायफचे कार्यक्रम अधिकारी सदाशिव निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक रोहिणी गाडे, नाशिक येथील डॉ. शब्बीरोद्दीन शेख, विभागीय अधिकारी डॉ. बाळासाहेब जिगळेकर, प्रकल्प अधिकारी सुधाकर बाबर, भालचंद्र राऊत आदी उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
सरपंच ग्रामसंसद महासंघाच्या...अकोला  ः शेगाव येथे नुकत्याच झालेल्या राज्य...
सातारा जिल्ह्यातील चार साखर...सातारा  : गाळप हंगामातील ऊस उत्पादकांची...
‘आदिनाथ'च्या कामगारांचे पगारासाठी ‘...सोलापूर : आदिनाथ साखर कारखान्याकडून ४१ महिने...
उजनी कालवा फुटला, पिके उद्‌ध्वस्तमोहोळ, जि. सोलापूर : उजनी धरणाचा डावा कालवा मोहोळ...
आधुनिक तंत्रांचा वापर करून स्मार्ट शेती...अकोला : ऊतिसंवर्धित हळद रोपांची निर्मिती आणि...
सांगली जिल्ह्यात अजूनही ९१ टॅंकर सुरूचसांगली  ः जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासूनच...
सिंधुदुर्गातील वृद्ध दाम्पत्यावर...सिंधुदुर्ग  ः पाळीव कुत्र्याला वाचविण्यासाठी...
पुणे जिल्ह्यात २१ ऑक्टोबर रोजी मतदानपुणे : ‘‘विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात शहरी...
अखेर बगाजी सागर ‘ओव्हर फ्लो’धामणगाव रेल्वे, जि. अमरावती  : अमरावती आणि...
'स्मार्ट' मुख्यालयाला मिळाली नवी जागापुणे :  राज्याच्या स्मार्ट प्रकल्पाच्या...
सोलापूर जिल्ह्यात मका लष्करी अळीने केला...सोलापूर ः दुष्काळातही जेमतेम पाण्यावर यंदा...
तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पुणे ः उत्तर, दक्षिण महाराष्ट्रात कमी दाबाचे...
अकोला जिल्ह्यात तीन तालुक्यांत अतिवृष्टीअकोला ः मागील २४ तासांत अकोला जिल्ह्यात दमदार...
डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार...पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम...
कर्जमाफी, ऊसबिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गारनवी दिल्ली : शेतकरी कर्जमाफी, थकीत ऊसबिल,...
पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी...नाशिक  : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना...
औरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
मराठवाड्यातील ११ मंडळांत जोरदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी ३८४...
`प्रक्रिया उत्पादनांवरील १२ टक्के...रत्नागिरी : कोकणातील फळ उद्योगांसाठी...
सांगली जिल्हा बॅंकेच्या ऑनलाइन परिक्षा...सांगली : जिल्हा बॅंकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या...