पोथरेत बीबीएफ पेरणी तंत्राबाबत प्रशिक्षण

सोलापूर : कृषि विभाग आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्यावतीने (आत्मा) पोथरे (ता. करमाळा) येथे कौशल्य आधारीत कामे करणाऱ्या शेतमजूरांसाठी बीबीएफ आणि ट्रॅक्टरव्दारे पेरणी तंत्राच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
Training on BBF sowing technique in Pothare
Training on BBF sowing technique in Pothare

सोलापूर : कृषि विभाग आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्यावतीने (आत्मा) पोथरे (ता. करमाळा) येथे कौशल्य आधारीत कामे करणाऱ्या शेतमजूरांसाठी बीबीएफ आणि ट्रॅक्टरव्दारे पेरणी तंत्राच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.  

विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहायक प्राध्यापक डॅा. सुहास उपाध्ये, रोहित कृषि इंडस्ट्रीजचे रुपेश फुलसुंदर यांनी शेतकऱ्यायांना हे प्रशिक्षण दिले. ‘आत्मा’चे प्रकल्प उपसंचालक शिवकुमार सदाफुले, तालुका कृषि अधिकारी गणेश दुरंदे, मंडळ कृषि अधिकारी अनिल चव्हाण, कृषि पर्यवेक्षक सुहास पोळके, राजेंद्र काळे, दत्तात्रय पवार यावेळी उपस्थित होते. 

उपाध्ये यांनी बीबीएफ टोकन यंत्राची ओळख व उपयोगीता तपशील, त्याचे फायदे तोटे, बीबीएफ टोकन यंत्रासाठी जमिनीची आवश्यक मशागत, पिकांच्या दोन ओळींतील अंतरानुसार टोकन यंत्राच्या भागाची योग्य जुळवणी, तसेच बीबीएफ टोकन यंत्र वापरासाठी ट्रॅक्टर निवड व आवश्यक समायोजन याबाबतचे मार्गदर्शन केले. 

फुलसुंदर यांनी बीबीएफ टोकन यंत्राच्या टोकन चकती बसविण्याची पद्धती, बियाणे प्रमाणे निश्चिती, बीबीएफ यंत्राव्दारे पेरणी करताना घ्यावयाची काळजी, यंत्राचा वापर झाल्यानंतर घ्यावयाची निगा व काळजी इत्यादींचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात सहभागी ट्रॅक्टर चालकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

यशस्वितेसाठी ‘आत्मा’चे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक अजयकुमार बागल, सत्यम झिंजाडे, कृषीसहायक भिमराव ढेकळे, विजय सोरटे यांनी परिश्रम घेतले. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक परमेश्वर सुतार यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com