agriculture news in Marathi training for corona Measures awareness Maharashtra | Agrowon

नगर : जागृतीसाठी दीड हजार गावांत स्वच्छागृहींना प्रशिक्षण 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 4 मे 2020

कोरोना संसर्गाची ग्रामीण भागातही बाधा होऊ लागल्याने जिल्हा परिषदेच्या पाणी स्वच्छता विभाग आणि युनिसेफ यांच्या तर्फे गाव पातळीवर स्वच्छागृहीं नियुक्त केले आहेत.

नगर ः कोरोना संसर्गाची ग्रामीण भागातही बाधा होऊ लागल्याने जिल्हा परिषदेच्या पाणी स्वच्छता विभाग आणि युनिसेफ यांच्या तर्फे गाव पातळीवर स्वच्छागृहीं नियुक्त केले आहेत. १ हजार ६९५ गावांतील स्वच्छागृहींना कोरोनाच्या उपाययोजनांबाबत जनजागृतीचे ऑनलाइन प्रशिक्षण दिले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागातून देण्यात आली. 

नगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे प्रशासन अधिक दक्ष झाले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले जात असुन जिल्हा परिषदेतील कर्मचारी, अधिकारीही कोरोनाच्या लढाईत सहभागी झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागानेही यासाठी पुढाकार घेतला असून ग्रामीण भागात कोरोना संरग्चाच्या पाश्वभूमीवर जनजागृतीसाठी स्वच्छागृही नियुक्त केलेले असून त्यांना कोरोना विषाणूची संकल्पना, स्वच्छता, मास्क हाताळणी, शारिरिक आंतर, गाव पातळीवर काम करणाऱ्या व्यक्तींनी घ्यावयाची काळजी, विविध आजाराने ग्रासलेल्या तसेच ज्येष्ठ व्यक्तीचा घ्यावयाची काळजी, आजाराबाबतचे समज, गैरसमज व अन्य बाबीवर ऑनलान प्रशिक्षण देण्यात आले. 

यावेळी युनिसेफच्या अर्पना कुलकर्णी, समन्वयक चंद्रकांत कचरे, बालाजी व्हरकटे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, सचीन थोरात, प्रशांत जगताप, मनोज सकट उपस्थित होते. 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...